अंबरनाथ क्राईम : अंबरनाथमध्ये तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला धावत्या एक्सप्रेसमधून अटक केली आहे. पोलिस तपासात हत्येमागे धक्कादायक कारण समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथमध्ये मंडळाच्या वर्गणीच्या हिशोबात घोळ केल्याचा आरोप करत एका तरुणाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर गावाला पळून जात असलेल्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या पथकाने धावत्या एक्स्प्रेसमधून बेड्या ठोकल्या.
अंबरनाथ पश्चिमेच्या बालाजी नगर परिसरात रविवारी रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान ही घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या गोविंद रामलू कोळी याने संदीप मढिवाल या तरुणाला मंडळाच्या वर्गणीच्या हिशोबात 5 हजार कमी कसे झाले? ते पैसे तू खाल्ले का? असा आरोप करत मारहाण केली. या मारहाणीत संदीप मढिवाल याचा मृत्यू झाला.
यानंतर आरोपी गोविंद कोळी हा आंध्र प्रदेशातील त्याच्या गावी पळून चालला होता. याबाबतची माहिती मिळताच उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या नेतृत्वाखाली क्राईम ब्रँचच्या 3 टीमने धावत्या एक्स्प्रेसमध्ये शोध घेत गोविंद कोळी याला पकडलं आणि कर्जत स्टेशनवर उतरवलं. खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीला पुढील तपासासाठी अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली आहे.
जामखेडमधील कला केंद्रातील अंतर्गत वादातून गर्भवती महिलेची हत्या करून तिचा मृतदेह धुळे जिल्ह्यातील गरताड बारीजवळ डोंगराळ भागात जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सहा जण आरोपी असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे, तर दोघांचा शोध सुरू आहे.
वाशिम शहरातील गवळीपुरा परिसरात पुतण्याने काकाची कुऱ्हाडीने हत्या केलीय.. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडालीय.. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तापास सुरु आहे.