एका व्यावसायिकाने 20 रुपयांच्या कचोरीची किंमत आपल्याला लाखोंमध्ये मोजावी लागेल याची कल्पनाही केली नसेल. व्यावसायिकला एका कचोरीसाठी तब्बल 20 लाख रुपये गमवावे लागले आहेत. कचोरी खाण्यासाठी घेतलेला ब्रेक इतका महाग पडेल असा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. आपली भूक मिटवण्यासाठी व्यावसायिक आपल्या स्कुटीवर थांबलेला असतानाच चोरांना आयती संधी दिली आणि समोर ठेवलेली 20 लाखांची बॅग पळवून नेली. काही सेकंदात ही घटना घडली. जयपूरमध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सोमवारी नाहरगड पोलीस ठाण्याच्या परिसरात घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुपारी 4 च्या सुमारास चंपालाल नावाचे एक व्यावसायिक कचोरी खाण्यासाठी थांबले होते. त्यांनी रोख रकमेची पिशवी आपल्या स्कूटरच्या समोर ठेवली होती. याचवेळी मागून स्कुटीवरुन आलेल्या दोन व्यक्ती ती पिशवी घेऊन पळून गेल्या.
क्षणात घडलेल्या या चोरीनंतर चंपालाल यांनी संशयितांचा पाठलाग केला. स्थानिक लोकही त्यांच्या मदतीला धावून आले, परंतु ते दोन्ही चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
₹20 Kachori Costs Trader ₹20 Lakh: Businessman's Cash-Filled Bag Stolen in Seconds in Jaipur's Nahargarh, Shocking Theft Captured on CCTV. In a stunning daylight heist in Jaipur's Nahargarh police station limits, businessman Champalal suffered a catastrophic loss of ₹20 lakh while stopping to buy a ₹20 kachori. The victim had placed a bag stuffed with ₹20 lakh in cash on the footboard of his scooter before stepping aside to grab a quick snack. Within moments, an opportunist thief snatched the unattended cash bag and vanished into the crowded street. The entire theft was captured on nearby CCTV surveillance cameras. Following an immediate distress call, Jaipur Police enforced widespread city barricading and launched a targeted manhunt based on the footage to nab the accused and recover the looted cash. @jaipur_police
— GarudEyeIntel | OSINT 🇮🇳 (@GarudEyeIntel) October 27, 2026
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये, चंपालाल आपल्या स्कूटरवर आरामात बसून कचोरी खाताना दिसत आहेत. ते कचोरी खात असतानाच, दुसऱ्या एका स्कूटरवरून दोन व्यक्ती त्यांच्या अगदी जवळ येऊन थांबल्या. त्यापैकी मागे बसलेल्या व्यक्तीने रोख रकमेची पिशवी हिसकावून घेतली आणि ते दोघेही तिथून पळून गेले. अशा परिस्थितीतही, हातात कचोरी घट्ट धरूनच चंपालाल त्या दोघांचा पायी पाठलाग करू लागले.
हेल्मेट घातलेल्या त्या दोन व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. चंपालाल यांच्या तक्रारीवरून नाहरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.