SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मजा करायला...', तरुणी रडत राहिली पण पोलिसांनी ऐकलं नाही; ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची दिली धमकी, VIDEO व्हायरल

पोलीस अधिकाऱ्याने एका जोडप्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 18, 2026, 15:14 IST | Updated: Nov 18, 2026, 15:23 IST
Image Credit: पोलीस अधिकाऱ्याची जोडप्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची धमकी
Join

आपल्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्याच पोलिसांनी एका जोडप्याला खोट्या ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी जोडप्याला धमकावत असताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 13 नोव्हेंबर रोजी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपक मिश्रा हॉटेलमध्ये जोडप्याला जाब विचारताना दिसत आहेत.

व्हिडीओत महिला पोलिसांना आम्ही दोघेही प्रौढ असून, एकाच जातीचे आहोत आणि लग्न कऱणार आहोत असं सागंताना ऐकू येत आहे. मात्र, पोलीस अधिकारी त्यांना त्यांच्या पालकांशी संपर्क साधण्याचा आग्रह धरतात.

जेव्हा महिला आपला मोबाईल फोन अनलॉक करण्यास आणि आपल्या कुटुंबाला फोन करण्यास नकार देते, तेव्हा मिश्रा आपल्या सहकाऱ्यांना पुरुषाजवळ गांजा ठेवण्यास सांगत असल्याचं ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये मिश्रा असं म्हणताना ऐकू येतात, "या मुलाच्या जवळ थोडा गांजा ठेवून द्या."

 

 

पोलीस अधिकारी जोडप्याला फटकारतानाही दिसतो आणि त्यांना प्रश्न विचारतो की, त्यांनी आपल्या पालकांना न सांगता किंवा त्यांचा विचार न करता एकत्र वेळ घालवण्याचा निर्णय कसा घेतला?

हॉटेल मालकाने स्थानिक पोलिसांवर खंडणी मागितल्याचा आरोपही केला आहे. ज्या 'सिद्धार्थ हॉटेल'मध्ये ही कथित घटना घडली, त्याचे मालक संजू सनोडिया यांनी आरोप केला आहे की, पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे दरमहा 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. सनोडिया यांचा आरोप आहे की, कोतवाली टीआय (TI) सतीश तिवारी, एसडीओपी (SDOP) चंचलेश मरकाम आणि ट्रॅफिक इन्स्पेक्टर विजय बघेल यांनी त्यांच्याकडे दरमहा 25 हजार रुपयांची मागणी केली होती.

आपणच पोलिसांचा खरा चेहरा उघड करण्याच्या हेतूने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं संजू सनोडिया यांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः, अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्याबद्दल एका प्रौढ नागरिकाला खोट्या फौजदारी प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES