• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /लेकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी नाचत असतानाच बापाचा हार्ट अटॅकने मृत्यू! लग्न होईपर्यंत मुलीपासून लपवलं अन् अखेर...; एकच हळहळ

लेकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी नाचत असतानाच बापाचा हार्ट अटॅकने मृत्यू! लग्न होईपर्यंत मुलीपासून लपवलं अन् अखेर...; एकच हळहळ

लेकीच्या लग्नादिवशीच एका पित्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मात्र कुटुंबीयांनी मुलीचे लग्न पूर्ण होईपर्यंत तिला सांगितलं नाही

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 26, 2026, 15:59 IST|Updated: Nov 26, 2026, 16:01 IST
joinshare
लेकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी नाचत असतानाच बापाचा हार्ट अटॅकने मृत्यू! लग्न होईपर्यंत मुलीपासून लपवलं अन् अखेर...; एकच हळहळ
Image Credit: मुलीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमात नाचतानाच बापाचा हार्ट अटॅकने मृत्यू!

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आपल्या लेकीचं लग्न डोळेभरुन पाहण्याचं स्वप्न प्रत्येक बापाने पाहिलेलं असतं. पण याच दिवशी एखाद्या पित्याला मृत्यूने गाठलं तर त्याहून दुसरी दुर्देवी घटना नाही. उदयपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका 51 वर्षीय व्यक्तीला मुलीच्या लग्नाच्या आधी सुरु असलेल्या सोहळ्यात (बिदोंली) आपला जीव गमवावा लागला. यामुळे आनंदाने भरलेल्या कुटुंबावर काही वेळातच दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र यावेळी कुटुंबीयांनी मनावर दगड ठेवून लग्न न थांबवण्याचा निर्णय घेतला. लग्न लागल्यानंतरच अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले.

20 नोव्हेंबरला रात्री उशिरा ही घटना घडली आहे. ऋषभदेव उपविभागांतर्गत येणाऱ्या पतियार (भुधर) गावातील ही घटना आहे. मृत व्यक्तीची ओळख शंकरलाल मेघवाल अशी पटली असून, ते अहमदाबादमधील एका खासगी कंपनीत चालक म्हणून काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरलाल आपली २६ वर्षांची मुलगी प्रियांका हिच्या 'बिंदोली' (वरात/मिरवणूक) दरम्यान नाचत असताना, अचानक त्यांना छातीत दुखू लागले आणि त्यांची प्रकृती बिघडली.

त्यांची मुलं दिलीप आणि उमेश इतर कुटुंबीयांसह त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना उदयपूरमधील एमबी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं. तिथे नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह रुग्णालयातील शवगृहातच ठेवला. 21 नोव्हेंबरला दुपारी प्रियंकाचं लग्न होणार असल्याने कुटुंबाला एक कठीण निर्णय घ्यावा लागणार होता.

शंकरलाल यांच्या मुलांनी सुरुवातीला आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी आई आणि बहिणीला न सांगण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांना सांगितलं की, वडिलांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, परंतु त्यांची बोलण्यासारखी स्थिती नाही.

दरम्यान, कुटुंबातील दोन व्यक्तींनी ही दुर्दैवी बातमी वराच्या कुटुंबीयांना दिली. 20 नोव्हेंबरच्या रात्री, वर आणि त्याचे 15-20  नातेवाईक चनावाडा गावापासून सुमारे 25 किमीचा प्रवास करून वधूच्या घरी पोहोचले. विवाहाचे विधी ठरलेल्या वेळेच्या आधीच, 21 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पूर्ण करण्यात आले. प्रियांकाला निरोप दिल्यानंतर त्याच दिवशी शंकरलाल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकरलाल यांच्या पश्चात प्रियांका आणि तिचे दोन धाकटे भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबीय आणि नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. कारण एका बाजूला मुलीला निरोप देण्याची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे कुटुंबाला आपल्या प्रमुखाच्या निधनाचे दुःख सहन करावे लागले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Viral News