SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ट्रकची बसला धडक, 23 जणांचा जागीच मृत्यू; भारतातील जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ भीषण अपघात

आसाममधील काझीरंगा जवळ मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 13, 2026, 17:12 IST | Updated: Nov 13, 2026, 17:19 IST
Join

Assam Accident :  आसाममध्ये असलेल्या भारतातील जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने बसला धडक दिली आहे. या भीषण अपघातात 23 जणांचा  जागीच मृत्यू झाला आहे.  या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

आसाममधील काझीरंगा जवळ मोठा रस्ते अपघात झासा आहे.  आसाम सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.   काझीरंगा येथे भरधाव ट्रकने प्रवासी बसला धडक दिली. या बसमध्ये मोठ्या संख्यने  विद्यार्थी प्रवास करत होते असे सांगितले जात आहे. 

13 नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळेस आसामच्या काझीरंगा येथील रोंगजानमध्ये हा अपघात झाला. एका प्रवासी वाहनाला ट्रकची धडक बसल्याने किमान 23 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात इतर अनेक जण जखमी झाले आहेत. बस बोकाखतहून नागावकडे जात असताना ही धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार, वाहनातील बहुतेक प्रवासी विद्यार्थी होते.

या धडकेमुळे ट्रॅव्हलर बसचे मोठे नुकसान झाले असून, अनेक प्रवासी आत अडकल्याचे वृत्त आहे. पोलीस आणि स्थानिक रहिवासी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. जखमींना उपचारासाठी कोहोरा मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिस तसेच बचाव पथक घटनास्ठळी दाखल झाले आहे. तताडीने बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेला नाही. मृत किंवा जखमी झालेल्यांची ओळखही तात्काळ कळलेली नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES