'सिग्नल लाल, इमर्जन्सी ब्रेक...', लोको पायलटच्या केबिनमधील थरारक Video समोर, ...म्हणून एक्स्प्रेस पलटी
कोलकाताहून मिझोरामला जाणाऱ्या सैरंग एक्स्प्रेसला गुवाहाटीजवळ अपघात झाला. या अपघाताच्या पूर्वीचा लोको पायलटच्या केबिनमधील एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
बुधवारी सकाळी सैरंग एक्स्प्रेस कोलकाताहून मिझोरामला जात असताना गुवाहाटीजवळ भीषण अपघात झाला. रेल्वेचे इंजिनसह पाच डबे रुळावरून घसरले. प्रवाशी झोपते असताना अचानक झालेल्या अपघातामुळे एकच भीतीदायक वातावरण पसरलं. सुदैवाने या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या एक्स्प्रेसला भीषण अपघात होण्यापूर्वीचा लोको पायलटच्या केबिनमधील थरारक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात या एक्स्प्रेस वेला अपघात होण्यामागील कारण स्पष्ट होतंय.
या व्हिडीओमध्ये रेल्वेच्या अपघात होण्यापूर्वी काही क्षणापूर्वी काय घडलं हे दिसतंय. या लोकोमोटिव्हच्या आतून रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये ऐकू येत आहे की, तो म्हणतोय सिग्नल लाल होता आणि आपत्कालीन प्रणाली काम करत नाहीय.
रेल्वेच्या अपघातापूर्वी नेमकं काय झालं आहे, याबद्दल या व्हिडीओमधून काही प्रमाणात स्पष्टता येत आहे. पण या कथित व्हिडीओची रेल्वेकडून अधिकृत पुष्टी आलेली नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोको पायलट हा प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत पाहिला मिळतोय. व्हिडीओनुसार, ट्रेन रुळावरून घसरण्यापूर्वी लोको पायलट वारंवार सांगत होती की, ‘सिग्नल रेड आहे… इमर्जन्सी ब्रेक लावलेला आहे पण तो काम करत नाहीये. इथे काहीच काम करत नाहीय.’ या व्हिडीओमधील ऑडिओवरून एवढं तर लक्षात आलं की, ट्रेन थांबवण्यात तांत्रिक अडचण येत होती. त्यानंतर काही सेकंदांतच जोरदार आवाज येतो आणि तेच ट्रेन एका बॅरिकेडला धडकून रुळावरून घसरल्याचं पाहिला मिळतं.
नक्की दुर्घटना कशी घडली?
'टाइम्स ऑफ इंडिया' मधील वृत्तानुसार, ही दुर्घटना बुधवारी सकाळी 6.54 मिनिटांच्या सुमारास घडल्याचे वृत्त समोर आलं. पूर्वोत्तर सीमांत रेल्वे (NFR) ने दिलेल्या माहितीनुसार, डिगारू स्थानकावर दुसऱ्या ट्रेनला प्राधान्य देऊन मार्गस्थ करण्यासाठी या एक्स्प्रेसला थांबा दिला गेला होता. पण लोको पायलटला ट्रेनची गती नियंत्रित करता आली नाही आणि क्षणात भीषण अपघात झाला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.