शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष का स्थापन केला? 1999 मधील भारतातील सर्वात मोठ्या राजकीय संघर्षाचा खळबजनक गौप्यस्फोट
सोनिया गांधी आत्मचरित्र : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. शरद पवार यांना काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष का स्थापन करावा लागला? भारतातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडीचा सोनिया गांधींच्या पुस्तकात खुलासा करण्यात आला आहे.
सोनिया गांधी आत्मचरित्र : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. शरद पवार यांना काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष का स्थापन करावा लागला? भारतातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडीचा सोनिया गांधींच्या पुस्तकात खुलासा करण्यात आला आहे.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात राष्ट्रवादीच्याय स्थापनेपूर्वीचा उल्लेख करण्यात आलाय. 1999 मधील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाचा मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या तत्कालीन कार्यकारिणीतील तीन नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. या पत्रात परदेशात जन्म झाल्यामुळे त्यांना भारतात सर्वोच्च पद भूषवता येणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली होती. त्यानंतर सोनिया गांधींनी राजीनामा दिला होता. मात्र त्यांच्या राजीनाम्यात पत्रात त्यांनी परदेशी जन्म झाला असला तरी भारत माझी मातृभूमी असून अखेरच्या श्वासापर्यंत मी भारतीयच राहीन, असं लिहिलं होतं.
दरम्यान कार्यकर्त्यांच्या दबाव आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या आग्रहानंतर सोनिया गांधींनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर शरद पवारांसह तिन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली.
सोनिया गांधींनी या पुस्तकात आणीबाणीवरही दावे केले आहेत. आणीबाणी लावण्यावरून इंदिरा गांधींवर नेहमीच टीका होते. मात्र या पुस्तकातून सोनियांनी इंदिरा गांधींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणीबाणी लागू करण्याचा इंदिरा गांधींचा विचार नव्हता असा दावा सोनिया गांधींनी बिलॉग्निंग ए जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकातून केला. आणीबाणी लागू करण्याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. राजीव गांधीही आणीबाणीच्या विरोधात होते. मात्र संजय गांधी हे आणीबाणी लावण्याच्या समर्थनात होते असं त्यांनी म्हटलंय.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचं राष्ट्रवादी SPचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले आहे. सोनिया गांधींचा प्रवास प्रेरणादायी असल्याचं रोहित पवारांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवारांची काँग्रेसशी जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर या पोस्टला विशेष महत्त्व आहे.
अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी सोनिया गांधींबाबत एक पोस्ट लिहून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एका परदेशी स्त्रीच्या येण्याने कुटुंबात झालेले अनेक मृत्यू हा विलक्षण योगायोग असल्याचं कंगना रनौत यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांच्या या पोस्टमुळे चर्चेला उधाण आलंय. या पुस्तकात सोनिया गांधींनी त्यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय आयुष्यातील प्रसंग शब्दबद्ध केले आहेत. दरम्यान कंगना रनौत यांच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण आले आहे.