• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /15 दिवस, 3 राऊंड अन् 7 मर्डर अन् मृतदेह जंगलात आणि डोंगरांमध्ये फेकायचा; बंगळुरु हत्याकांडाची इनसाइड स्टोरी

15 दिवस, 3 राऊंड अन् 7 मर्डर अन् मृतदेह जंगलात आणि डोंगरांमध्ये फेकायचा; बंगळुरु हत्याकांडाची इनसाइड स्टोरी

बंगळुरुमध्ये, कॅब चालक इंदुशेखरने त्याची पत्नी आणि सात नातेवाईकांच्या हत्या केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार मृतदेह शोधून काढले आहे. या हत्याकांडाची भयानक इनसाइट स्टोरी समोर आली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 10, 2026, 20:02 IST|Updated: Nov 13, 2026, 16:07 IST
joinshare
15 दिवस, 3 राऊंड अन् 7 मर्डर अन् मृतदेह जंगलात आणि डोंगरांमध्ये फेकायचा; बंगळुरु हत्याकांडाची इनसाइड स्टोरी
Image Credit: Bengaluru cab driver

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बंगळुरू हत्याकांडमुळे कर्नाटकसह संपूर्ण देश हादरला आहे. एका कॅब चालकाने पत्नीसग सासरच्या कुटुंबातील सात जणांची निर्घृणपणे हत्या केली. या हत्येत त्याची साथ त्यांची अल्पवयीन मुलीने दिल्याचे धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी तपासानंतर सांगितलं की, आरोपीने कौटुंबिक वादातून आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या कथित अपमानातून हा गुन्हा केला आहे. या नराधमाने  16 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या 15 दिवसांमध्ये हे हत्याकांड टप्प्याटप्याने केलंय.

बंगळुरु हत्याकांडाची इनसाइड स्टोरी


पोलिसांनी सांगितलं की, या आरोपीचं नाव इंदुरशेखर 50 वर्षांचा आहे. असून तो  त्याने या लोकांना जेवणात आणि पेयात झोपेच्या गोळ्या मिसळून बेशुद्ध केलं आणि नंतर त्यांच्या डोक्यात दगड मारुन हत्या केली. सुनीता या महिलेशी त्याचं लग्न 20 वर्षांपूर्वी झालं होतं. पोलिसांना या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक खुलासा झाला आहे.

पोलिसांनी सांगितलं की, सुनीता आणि तिच्या कुटुंबातील इतर सहा लोक एकामागून एक अचानक गायब झालेत. पूर्वी नातेवाईकांना वाटलं ते कुठेतरी गेले असले. पण त्यानंतर त्यांचे फोन लागले नाही, संपर्क झाला नाही, मग त्यांची चिंता वाढली. नातेवाईकांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली. 2 नोव्हेंबरला पोलिसांना सगळं सांगितल्यावर 3 नोव्हेंबरला तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार इंदुरशेखरच्या मेहुणाची पत्नीच्या आईने केली होती.

सहा सदस्य एका मागोमाग अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार पाहून पोलीसही चक्रावले आणि त्यांनी तातडीने तपास सुरु केला. त्यावेळी बेपत्ता लोकांचे मोबाईलचे लोकेशन तपासल्यावर त्या सगळ्यांचे मोबाईलचे लोकेशन एकाच ठिकाणी मिळाले. धक्कादायक म्हणजे इंदुशेखरचा मोबाईल फोनही तिच्या परिसरात लोकेट झाले. त्यामुळे पोलिसांच्या संशय इंदुशेखरवर गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्याला संशय आला आणि तो परिसरातून पळून गेला.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी इंदुशेखर हलसुरू गेट परिसरात दिसून आला. काही कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढण्यासाठी तो तिथे आला होता. त्याची अल्पवयीन मुलगी आणि शंकरचा मुलगा, यतीन, हे देखील त्याच्यासोबत त्या कारमध्ये होते. पोलिसांनी त्याच्या गाडीला घेराव घालून त्याला अटक केली आणि त्या दोन मुलांची सुटका केली. त्याची कार पोलिसांनी जप्त केली.

पोलिसांनी सांगितलं की चौकशीदरम्यान, त्याने पत्नी सुनीतासह आपल्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याची कबुली दिली. यतीन हा त्याचा आठवा बळी होता. त्यासोबत तो अजून एका व्यक्ती हत्या करणार होता. पण त्याआधी तो पोलिसांच्या तावडीत सापडल्यामुळे हा कट पूर्ण होऊ शकला नाही. धक्कादायक म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची अल्पवयीन मुलगी मदत करत होती.


पोलिसांच्या तपासानुसार, हत्याकांडाला सुरुवात 16 ऑक्टोबर रोजी सुरू झाला. 20 वर्षांच्या संसारात इंदुशेखर आणि सुनीता यांच्यात अनेकदा भांडणं आणि वादावादी होत होती. त्या दोघांमध्ये 12 वर्षांचा फरक होता. सुनीता कथितरित्या वारंवार आपल्या पतीच्या पुरुषत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होती. त्याचा अपमान करत असे. तिने कथितरित्या तीन-चार वेळा, काही प्रसंगी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा, अशा प्रकारची वक्तव्ये केल्यामुळे तो त्या सगळ्यांचा द्वेष करत होता.

आता त्याचा रागात भर तेव्हा पडली 14 ऑक्टोबरला त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर त्याने सुनीतासह सगळ्यांच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने झोपेच्या गोळ्या, प्लास्टिकच्या पिशव्या आणि दोऱ्या विकत घेतल्यात.  16 ऑक्टोबरला रात्री त्याने घरी नॉनव्हेज बनवलं आणि दारू प्यायली. त्याने सुनीताच्या दारूमध्ये गुंगीचे औषध मिक्स केलं. सुनीता बेशुद्ध पडल्यानंतर, त्याने तिच्या डोक्यात जात्याच्या दगडाने प्रहार करुन हत्या केली. धक्कादायक म्हणजे हे सगळं त्यांच्या अल्पवयीन मुलीने पाहिलं.  

हत्येनंतर, आरोपीने सुनीताचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून बेडरूममध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी, 17 ऑक्टोबर रोजी, सुनीताची आई, रूपावती आपल्या मुलीला फोन करत होती. पण जेव्हा तिचा फोन बंद आला.  तेव्हा तिने तिचा जावई, इंदुशेखरला फोन केला. तेव्हा इंदुशेखरने त्यांना सांगितलं की, सुनीता घरी असून तिने तुम्हाला घरी बोलावलं आहे.  18 ऑक्टोबर रोजी, रूपावती बंगळूरमधील भाष्यम सर्कलजवळील त्याच्या घरी पोहोचली. जेव्हा तिने आपल्या मुलीबद्दल विचारलं, तेव्हा आरोपीने टाळाटाळीची उत्तरे दिली.

त्यानंतर इंदुशेखरच्या अल्पवयीन मुलीने तिची आजी रूपावतीला नॉनव्हेजचं जेवण आणि दारू प्यायला दिली. रूपावती जेवत असताना, आरोपीने टीव्हीचा आवाज वाढवला आणि नंतर मागून जात्याच्या दगडाने तिच्या डोक्यात वार करुन हत्या केली. वडील आणि मुलीने तिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत भरला. 19 ऑक्टोबरच्या रात्री, दोन्ही मृतदेह एका कारमधून तामिळनाडूतील सेलम आणि धर्मपुरी दरम्यानच्या घाट परिसरात फेकला. पण आरोपीने दोन्ही महिलांचे मोबाईल फोनही स्वतःकडे ठेवले होते.

पुढे पोलिसांनी सांगितलं की, 23 ऑक्टोबर रोजी शिवकुमारने त्याची बहीण सुनीता आणि आई रूपावती यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्या दोघांचे फोन लागत नव्हते. त्यानंतर त्याने त्याचा मेहुणा इंदुशेखर याला फोन केला. आरोपीने त्याला सांगितले की सुनीता आणि रूपावती सहलीला गेल्या आहेत. त्याने शिवकुमारला त्याच्या घरी जेवायलाही बोलावले. 24 ऑक्टोबर रोजी, शिवकुमार, त्याची पत्नी दिव्या आणि मुलगा पुनीत यांच्यासह आरोपीच्या घरी गेले.

यावेळीही त्याने नॉनव्हेज आणि दारूचे बेत ठेवला. त्याने या लोकांना दारूमधून झोपेच्या गोळ्या दिल्यात. जेवणानंतर दिव्या आणि पुनीत बेडरूममध्ये झोपायला गेले. तर शिवकुमार हॉलमध्ये झोपला. त्यानंतर आरोपीने कथितरित्या सर्वजण गाढ झोपेपर्यंत वाट पाहिल्यानंतर त्याने जात्याच्या दगडाने शिवकुमारच्या डोक्यात मारून हत्या केली. त्याच्या अल्पवयीन मुलीने मृतदेह पॅक करण्यास मदत करण्यास मदत केली आणि तो स्वयंपाकघरात ठेवला.

25 ऑक्टोबरच्या सकाळी दिव्या उठली आणि बाथरूममध्ये जाण्यासाठी खोलीतून बाहेर पडली. जेव्हा तिने तिच्या पतीबद्दल विचारले, तेव्हा आरोपीने तिच्यावर जात्याच्या दगडाने हल्ला केला. दिव्याच्या किंकाळ्या ऐकून त्यांचा मुलगा पुनीत, खोलीतून बाहेर आला. आरोपीने पुनीतचीही हत्या केली. त्यानंतर वडील आणि मुलीने दिव्या आणि पुनीतचे मृतदेह प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. असं करत या दोघा बापलेकीने एक एक करत पाच जणांची हत्या केली.

पुढे 27 ऑक्टोबरला आरोपीने आपल्या मुलीसोबत तिन्ही मृतदेह घेऊन गाडीतून त्यातून शिवकुमार आणि दिव्या यांचे मृतदेह म्हैसूरमधील चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी फेकून दिलेत. मात्र, त्याने पुनीतचा मृतदेह बंगळूरुला परत आणून गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवला. आरोपीने कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी दिव्याच्या आईला तिच्या मोबाईल फोनवरून एक मेसेज पाठवला होता, ज्यात त्याने लिहिलं होतं की, कुटुंब सहलीला गेले आहे. 

त्यानंतर 31 ऑक्टोबरला शंकरने त्याची बहीण, आई आणि शिवकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यापैकी कोणाचाही फोन लागला नाही. त्यानंतर त्याने इंदुशेखरला फोन केला. आरोपीने त्याला सांगितलं की संपूर्ण कुटुंब सहलीवर गेलंय. परत तेच आरोपीने शंकर आणि त्याच्या कुटुंबाला रात्रीच्या जेवणासाठी आपल्या घरी बोलवलं.  मग 1 नोव्हेंबर रोजी शंकर त्याची पत्नी नलिनी आणि मुलगा यतीन आरोपीच्या घरी जेवायला आलेत. यावेळीही त्याने नॉनव्हेज जेवण बनवलं. त्यानंतर दारूमध्ये झोपेची गोळी मिक्स केली. 

शंकर आणि नलिनी रात्रीच्या जेवणानंतर झोपी होती पण यतीन जागा होता. जेव्हा आरोपी नलिनीवर हल्ला करणार तेवढ्यात यतीन खोलीतून लघवी करण्यासाठी बाहेर आला. आरोपीने जात्याच्या दगडाने तिच्या डोक्यावर वार केला. जेव्हा नलिनीने ओरडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिचा गळा दाबून हत्या केली. 

आवाज ऐकून यतिनने त्याच्या काकाला विचारले, काय झालं. आरोपीने त्याला सांगितले की काहीही झाले नाही आणि त्याला दोन मिनिटे बाहेर थांबायला सांगितलं. त्यानंतर त्याने झोपलेल्या शंकरच्या डोक्यात जात्याच्या दगडाने वार करुन हत्या केली. त्यांचे मृतदेह प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरली.त्याच वेळी आरोपीला यतीनलाही मारण्याचा कट होता. पण मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या घाईत त्याने तो कट सोडून दिला. मृतदेहाची विल्हेवाट लावताना यतीन त्याच्यासोबत होता.

पुढे 2 नोव्हेंबरच्या सकाळी इंदुशेखरने शंकर आणि नलिनी यांचे मृतदेह गाडीत ठेवून कर्नाटकातील शिराडी घाटाजवळ फेकून दिली आहे. त्यानंतर त्याने गाडीच्या ट्रंकमध्ये आधीच असलेला पुनीतचा मृतदेह बाहेर काढून नंदी टेकड्यांजवळ फेकून दिला. या घटनेवेळी यतीनही आरोपीसोबत उपस्थित होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा आरोपीने आपल्या आई-वडिलांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली, तेव्हा यतीनही त्याच्यासोबत होता. या घटनेत अल्पवयीन मुलांची भूमिका काय होती आणि त्यांच्यासोबत काय घडले, याचा तपास पोलीस आता करत आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत चार मृतदेह सापडले आहेत. सुनीता आणि रूपावती यांचे मृतदेह तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील येरकौड घाट परिसरात सापडले. शिवकुमार आणि दिव्या यांचे मृतदेह म्हैसूरमधील चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी सापडले. पोलिसांनी आरोपी इंदुशेखरसोबत विविध ठिकाणी जाऊन त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मृतदेहांचा शोध घेतला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत चामुंडी टेकड्यांजवळ मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime