SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

2027 मध्ये भारतात मोठा राजकीय भूकंप येणार? 'या' राज्यात BJP ची सत्ता जाणार? राजकारणातील सर्वात मोठे भाकित!

2027 मध्ये भारतात मोठा राजकीय भूकंप येणार आहे. 'व्होट व्हाइब'ने एक सर्वेक्षण केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा कल जाणून घेण्यात आला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 17, 2026, 21:37 IST | Updated: Nov 17, 2026, 21:40 IST
Join

UP Election 2027 Survey: 2027 मध्ये भारतात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. भाजपला मोठा धक्का बसणार आहे. 2027 मध्ये  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत.   उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाआधी 'व्होट व्हाइब'चा एक सर्वे प्रसिद्ध झाला आहे. या सर्वेक्षणातील अहवाल भाजपसाठी धक्का देणारा आहे.   या सर्वेक्षणानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी समाजवादी पक्षात काँटे की टक्कर होणार आहे. यामुळे समाजवादी पक्ष देखील सत्ता खेचून आणू शकतो असा आकड्यांचा कल दिसत आहे. 
 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने 'व्होट व्हाइब'ने एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून मतदारांचा कल जाणून घेतला.   या सर्वेक्षणात विचारण्यात उत्तर प्रदेशातील मतदारांना काही प्रश्न विचारण्यात आले. उत्तर प्रदेशातील 2027 च्या निवडणुकीत तुम्ही कोणत्या आघाडीला किंवा पक्षाला मतदान कराल? 41.9 टक्के लोकांनी भाजपच्या आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. तर, 39.1 टक्के लोकांनी सपा आघाडीला मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. 6.4 टक्के लोकांनी बसपाला, 4.9 टक्के लोकांनी इतरांना मतदान केले, तर 7.8 टक्के  लोकांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजप आणि समाजवादी पक्षात अटीतटीची लढत

व्होट व्हाइबच्या सर्वेक्षणाची आकडेवारी पाहता उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीत अटीतटीची लढत दिसून येत आहे. राज्यातील ग्रामीण भागात दोन्ही आघाड्यांचा मजबूत मताधार आहे. सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशच्या शहरी भागात भाजपची स्पष्ट आघाडी दिसत आहे. शहरी भागातील मतदारांनी भाजप आघाडीला आपली पहिली पसंती दिली आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशात मोठी चुरस

पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला मतदारांनी मोटा पाठिंबा दर्शवला आहे. असे असले तरी समाजवादी पक्ष (एसपी) आणि त्यांच्या मित्रपक्षांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अवध प्रदेशात एसपीची स्थिती मजबूत असल्याचे सर्वेक्षणात दिसत आहे.  पूर्वांचल आणि बुंदेलखंडमधील मतदारांची मतेही जाणून घेण्यात आली. यानुसार, या दोन्ही प्रदेशांमध्ये भाजप आणि समाजवादी पक्ष (एसपी) यांच्या आघाडीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

ओबीसी व्होट बँक निर्णायक ठरणार?

उत्तर प्रदेशात ओबीसी व्होट बँक निर्णायक ठरणार आहे.  व्होट व्हाइबच्या सर्वेक्षणानुसार ओबीसी यादव मतदारांचा  समाजवादी पक्षाला (एसपी)  पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे, तर गैर-यादव मतदार भाजपला पसंती देत ​​आहेत. दलित मतदारांमध्ये, जाटवांनी बसपाला मतदान करणार असल्याचे संकेत दिले आहेत. गैर-जाटव दलित भाजपसोबत असल्याचे दिसून येते. सर्वसाधारण प्रवर्गातील 66 टक्के मतदार भाजपसोबत असल्याचे वृत्त आहे.

2022 मध्ये भाजपमध्ये दुसऱ्यांदा सत्ता मिळवली

2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड बहुमत मिळवून सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. 403 जागांच्या विधानसभेत भाजपने 255 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. तर त्यांचे मित्रपक्ष, अपना दल (सोनेलाल) ने 12 जागा जिंकल्या. निशाद पक्षाने 6 जागांवर विजय मिळवला.  भाजप आघाडीने एकूण 273 जागा जिंकल्या. समाजवादी पक्ष 111 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आला. त्यांचे मित्रपक्ष, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) ने ८ जागा आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (एसबीएसपी) 6 जागा जिंकल्या. काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला. तर बहुजन समाज पक्षाला केवळ 1 जागा मिळाली आहे. याशिवाय, जनसत्ता दलाने (डेमोक्रॅटिक) 2 जागा मिळवल्या आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES