SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

एम.के स्टॅलिन यांची समजूत काढण्यात राहुल, सोनिया गांधींना अपयश आले आहे. स्टॅलिन यांच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 29, 2026, 20:07 IST | Updated: Nov 29, 2026, 20:13 IST
Join

एम.के स्टॅलिन : 50 वर्षांची मैत्री भाजपने 24 तासात तोडल्याची चर्चा रंगली आहे.  इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का बसला आहे. एम.के स्टॅलिन यांची समजूत काढण्यात राहुल, सोनिया गांधींना अपयश आलं आहे. एम.के स्टॅलिन यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्यानंत राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जून खरगे हे तामिळनाडूत स्टॅलिन यांच्या भेटीसाठी गेले होते. दरम्यान स्टॅलिन यांच्यासोबत दोन तास चर्चा करूनही त्यांची समजूत काढण्यात सोनिया, राहुल गांधींना यश आलं
नाही. एम.के स्टॅलिन हे एनडीएला पाठिंबा देण्यावर ठाम आहेत.

एम. के. स्टॅलिन यांची प्रतिक्रिया

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर इंडिया ब्लॉक नेत्यांची भेट घेतल्यानंतर, डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया दिली.  जर १९७१ च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना केली गेली, तर तामिळनाडूवर प्रतिकूल परिणाम होईल.  संपूर्ण दक्षिण भारतीय राज्यांवर याचा परिणाम होईल.  विशेषतः दक्षिण भारतीय राज्यांमधील राजकीय पक्षांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. या परिस्थितीत, या विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

संसदेतील आमच्या ताकदीचा वापर करून, आम्ही पुढील 25 वर्षांसाठी तामिळनाडूचे राजकीय भविष्य सुरक्षित केले आहे.  या बाबतीत भावनिक किंवा अविचारी निर्णय घेण्यास अजिबात वाव नाही. अण्णांपासून स्टॅलिनपर्यंत, आम्ही राज्याच्या हक्कांसाठी लढलो आहोत आणि त्या लढ्यात आम्ही विजयी होऊ. देशभरातील नेते येथे आले असले तरी, आमची भूमिका भूतकाळात, वर्तमानात आणि सदैव तीच आहे. तामिळनाडू प्रथम येतो."

"जर प्रस्तावित विधेयक नामंजूर झाले, तर तामिळनाडूला उपलब्ध असलेले किमान संरक्षणदेखील आपण गमावू... या परिस्थितीत, या विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. २०२७ मध्ये होणाऱ्या सीमांकन प्रक्रियेमुळे दक्षिणेकडील राज्यांचे नुकसान होईल... देशभरातील नेते येथे आले असताना, आमची भूमिका भूतकाळात, वर्तमानात आणि सदैव तीच आहे. तामिळनाडू प्रथम."

डीएमके आणि भाजप एकत्र येऊ शकतात का?

परिसीमन विधेयकाला डीएमकेने दिलेल्या पाठिंब्यानंतर, भविष्यात हा पक्ष भाजपसोबत राजकीय जवळीक वाढवू शकतो का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र, डीएमकेने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दिलेला पाठिंबा हा भाजपसोबतच्या संभाव्य युतीचा संकेत असल्याची चर्चा आहे. 

काँग्रेस आणि डीएमके यांची 50 वर्षांची मैत्री

काँग्रेस आणि डीएमके यांची 50 वर्षांची राजकीय मैत्री आहे. 1996 काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे द्रमुक आणि इंदिरा गांधी यांच्यातील जवळीक वाढली. 1971 च्या लोकसभा निवडणुकीसाठी युती केली.तत्कालीन द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांनी इंदिरा गांधींनी 1975 मध्ये लादलेल्या आणीबाणीला विरोध केला. यानंतर, 1977 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेने काँग्रेसपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. 1980 मध्ये दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी केली. 1984 मध्ये समीकरणे पुन्हा बदलली. यावेळी, द्रमुकने डावे, जनता पक्ष आणि इतर प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी केली, तर काँग्रेसने एआयएडीएमकेसोबत युती केली. 1989 आणि 1991 च्या निवडणुकांमध्येही डीएमके काँग्रेसविरोधी गटात सामील झाली. 1997 मध्ये काँग्रेस आणि डीएमके यांच्यातील संबंध बिघडले. काँग्रेसने तत्कालीन संयुक्त आघाडी सरकारकडून आपला पाठिंबा काढून घेतला. काँग्रेस आणि डीएमके यांच्यातील खरी राजकीय जवळीक 1971 मध्ये सुरू झाली. 2013-14 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा फूट पडली. ते एकत्र आले आणि मे 2026 च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत युती टिकली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES