• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /दिवाळीच्या रात्री भाजपा आमदाराच्या भावाची गोळ्या घालून हत्या; काँग्रेस कनेक्शन आलं समोर

दिवाळीच्या रात्री भाजपा आमदाराच्या भावाची गोळ्या घालून हत्या; काँग्रेस कनेक्शन आलं समोर

भाजपा आमदार अर्चना पांडे यांच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 09, 2026, 10:36 IST|Updated: Nov 09, 2026, 10:47 IST
joinshare
दिवाळीच्या रात्री भाजपा आमदाराच्या भावाची गोळ्या घालून हत्या; काँग्रेस कनेक्शन आलं समोर
Image Credit: भाजपा आमदाराच्या भावाची गोळ्या घालून हत्या

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळीच्या रात्रीच भाजपा आमदाराच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात ही घटना घडली आहे. भाजपा आमदार अर्चना पांडे यांचे बंधू असणारे वकील अनुज कुमार चतुर्वेदी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या निवडणुकीशी संबंधित वैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येमुळे दिवाळीचा आनंद दुःखात रूपांतरित झाला आहे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमूल दीक्षित हे या प्रकरणातील मुख्य संशयित असून, गोळीबारानंतर फरार झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तपासासाठी पाच पथके गठित केली आहेत.

दिवाळीच्या रात्रीच हत्या

दिवाळीच्या रात्री, जिल्ह्यातील छिबरामऊ कोतवालीजवळ वकील अनुज कुमार चतुर्वेदी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृत व्यक्ती भाजप आमदार अर्चना पांडे यांचे नातेवाईक होते. या हत्याकांडात काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अमूल दीक्षित संशयित असून, त्यांनीच चार गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार अर्चना पांडे घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. पोलीस अधीक्षक विनोद कुमार आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी उपस्थित आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाच स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.

जुनं शत्रुत्व आणि जमिनीचा वाद

या हत्येमागे निवडणुकीशी संबंधित वैर आणि जमिनीचा वाद असल्याचे मानले जात आहे, मात्र अधिकृतपणे याची पुष्टी होणे अजून बाकी आहे. पीडित व्यक्तीचा भाऊ, धीरज चतुर्वेदी याने सांगितले की, आरोपी अमोल दीक्षित याचे यापूर्वी त्याच्या धाकट्या भावाशी भांडण झाले होते आणि त्याने त्याला कानाखालीही मारली होती. या प्रकरणावर जाब विचारण्यासाठी अनुज गेला असता, आरोपीने पिस्तूल काढून चार गोळ्या झाडल्या.

ही घटना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोरच्या गल्लीत घडली, ज्यामध्ये वकील अनुज कुमार चतुर्वेदी यांचा जागीच मृत्यू झाला. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत असून, अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP