• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'फटाक्यांमुळे आजार बरे होतात,' भाजपा आमदाराचं अजब विधान, नंतर म्हणाल्या 'मी तर...'

'फटाक्यांमुळे आजार बरे होतात,' भाजपा आमदाराचं अजब विधान, नंतर म्हणाल्या 'मी तर...'

फटाक्यांमुळे आजार बरे होतात असं अजब विधान भाजपा आमदार पापिया अधिकारी यांनी केलं आहे. या वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 10, 2026, 08:26 IST|Updated: Nov 10, 2026, 08:32 IST
joinshare
'फटाक्यांमुळे आजार बरे होतात,' भाजपा आमदाराचं अजब विधान, नंतर म्हणाल्या 'मी तर...'
Image Credit: 'फटाक्यांमुळे आजार बरे होतात,' भाजपा आमदाराचं अजब विधान

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

फटाक्यांमुळे आजार बरे होतात असं अजब विधान भाजपा आमदार पापिया अधिकारी यांनी केलं आहे. पापिया अधिकारी भाजपाच्या पश्चिम बंगालमधील आमदार असून त्यांच्या विधानावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जर आपल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझं विधान मागे घेण्यास तयार आहेत आणि ते मागे घेतलं आहे असं समजावं असं त्यांनी म्हटलं आहे.

कोलकाता येथे एएनआयशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, "आपल्या पूर्वजांच्या काळापासून या परंपरांशी संबंधित एक दीर्घकालीन श्रद्धा चालत आली आहे. मुळात, हा प्रकाशाचा सण आहे, दिवे प्रज्वलित करण्याचा उत्सव आहे ज्याचा उद्देश सामाजिक अनिष्ट संपवणं आहे."

'पूर्वीच्या काळी 'यज्ञ' करून आणि दिवे लावून सामाजिक अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करायचे'

भाजपा आमदार पापिया अधिकारी यांनी म्हटले आहे, "पूर्वीच्या काळी सामाजिक अनिष्ट प्रथांना दूर करण्यासाठी विविध परंपरा आणि प्रथांची मदत घेतली जात असे. अनेक सामाजिक दोष नष्ट करण्यासाठी 'यज्ञ' करणे किंवा दिवे लावण्यासारख्या प्रथा वापरल्या जात असत. मात्र, आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे फटाक्यांचा प्रभाव अधिक आहे आणि विज्ञानानेही मोठी प्रगती केली आहे. अशा परिस्थितीत, तो दृष्टिकोन कदाचित आता तितकासा समर्पक ठरणार नाही."

 

#WATCH | Kolkata: On her remarks about Diwali firecrackers curing illness, actor and BJP MLA Papiya Adhikari says, "There is an old saying from our ancestors regarding these traditions. In essence, this is a festival of lights—a festival of lighting lamps—meant to eradicate social evils. In the past, through rituals, many such evils were addressed. Now, however, we live in the era of firecrackers, and given how much science has advanced, perhaps that perspective is no longer appropriate. If anyone has been hurt, I apologise. I am willing to retract my statement; consider it withdrawn. But the core idea remains: such social evils were—and still can be—eradicated."

— ANI (@ANI) November 9, 2026

 

त्या म्हणाल्या की, "माझ्या शब्दांमुळे कोणाला वाईट वाटलं असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांची माफी मागते. मी माझे विधान मागे घ्यायलाही तयार आहे. मी ते विधान मागे घेतले आहे असे समजावे. मात्र, माझा मुख्य मुद्दा हाच आहे की, भूतकाळात समाजातील वाईट गोष्टी संपवण्यासाठी अशा पद्धतींचा वापर केला जात असे आणि आजही त्या संपवण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो."

पापिया अधिकारी यांनी कोणते वादग्रस्त विधान केले?

पश्चिम बंगालमधील टॉलीगंज मतदारसंघाच्या भाजप आमदार पापिया अधिकारी यांनी, आपल्या मतदारसंघातील एका काली पूजेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित असताना हे वादग्रस्त विधान केले. त्यांचे भाषण सुरु असतानाच तिथे एक फटाका फुटला.

यानंतर त्या म्हणाल्या, "आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की आपण फटाके फोडणार आहोत. फटाक्यांशिवाय काली पूजा पूर्ण कशी होऊ शकते? आपण नक्कीच फटाके फोडणार आहोत. अर्थात, आपण पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालनही करू." त्यांनी पुढे असेही म्हटले की, "तुम्ही पाहाल की, फटाके फोडल्यामुळे अनेक आजार बरे होतात."
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
Marathi News