• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /नववीच्या सहामाहीमध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून वडिलांनी गिफ्ट केली ₹2.30 कोटींची BMW; मुंबईला आले अन्...

नववीच्या सहामाहीमध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून वडिलांनी गिफ्ट केली ₹2.30 कोटींची BMW; मुंबईला आले अन्...

सध्या या कारचे फोटो चांगलेच व्हायरल झाले असून ही कार भेट देणाऱ्या वडिलांनी आणि त्यांच्या मुलाने नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात सविस्तरपणे...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 09, 2026, 12:00 IST|Updated: Nov 09, 2026, 12:11 IST
joinshare
नववीच्या सहामाहीमध्ये चांगले मार्क मिळाले म्हणून वडिलांनी गिफ्ट केली ₹2.30 कोटींची BMW; मुंबईला आले अन्...
Image Credit: वडिलांनी सांगितलं एवढ्या महागड्या गिफ्टचं कारण (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात नातेवाईकांनी किंवा पालकांनी कौतुकाची थाप म्हणून तुम्हालाही कधी न कधी बक्षीस दिलं असेल. हे बक्षीस चॉकलेट, कपडे किंवा आवडत्या वस्तूच्या स्वरुपात देण्यात आलं असेल. मात्र पश्चिम बंगालमध्ये एका शाळकरी मुलाला त्याच्या वडिलांनी चक्क बीएमडब्यू कार परीक्षेत पास झाल्याबद्दल गिफ्ट म्हणून दिली आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा काही 10 वी, 12 वी ची नव्हती तर नवव्या इयत्तेमधील सहामाही परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल दिली आहे. या बीएमडब्यूची किंमत 2 कोटी 30 लाख रुपये इतकी आहे. 'बीएमडब्ल्यू'चं हे 'एम 4 कॉम्पिटिशन' मॉडेल आहे.

कार घेण्याच्या निर्णयाबद्दल काय म्हणाले?

मिळालेल्या माहितीनुसार, ही अनोखी भेट शमसुद्दीन मिद्या नावाच्या व्यापाऱ्याने त्याचा मुलगा मोहम्मद तल्हा याला भेट दिली आहे. शमसुद्दीन मिद्या हे पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यातील गल्सी येथील 'पराज' भागात वास्तव्यास आहेत. मुलाने नववीच्या परीक्षेत सहामही परीक्षेत मिळेवल्या यशाबद्दल ही कार भेट देताना मुलाला मागील बऱ्याच काळापासून स्पोर्ट्स कार हवी होती असं म्हटलं आहे. मोहम्मद तल्हा याला मागील काही काळापासून 'बीएमडब्ल्यू एम 4 कॉम्पिटिशन' घ्यायची इच्छा होती. त्याची हीच इच्छा त्याच्या वडिलांनी नववीच्या सहामाही परीक्षेतील त्याचे चांगले गुण पाहिल्यानंतर लगेच पूर्ण केली. शमसुद्दीन हे स्थानिकामध्ये व्यावसायासंदर्भातील अनोख्या उपक्रमांबरोबरच आणि महागड्या गाड्यांची आवड असलेली व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे आधीपासूनच रेंज रोव्हर, व्होल्वो, महिंद्रा थार आणि ह्युंदाई अल्काझार सारख्या गाड्यांचा ताफा आहे. आता या यादीमध्ये'बीएमडब्ल्यू एम4 कॉम्पिटिशन'चीही  भर पडली आहे.

मुंबईहून पश्चिम बंगालला नेली कार

विशेष म्हणजे व्यापारी असलेले शमसुद्दीन हे त्यांच्या लाडक्या मुलाला हवी असलेली 'बीएमडब्ल्यू एम 4 कॉम्पिटिशन' कार खरेदी करण्यासाठी कोलकात्याहून मुंबईला आले होते. मुंबईमधील आलिशान शो रुममध्ये या कारची ऑर्डर दिल्यानंतर काही आठवड्यांनी ही 2.30 कोटींची कार पूर्व बर्धमानमध्ये पोहचली आहे. या कारचा रंग आणि ती भेट देण्यामागील कारणामुळे ही कार सध्या स्थानिकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे.

मुलगा काय म्हणाला?

शमसुद्दीन यांनी आपल्याला मुलाची इच्छा पूर्ण करण्याइतकं सामर्थ्य दिल्याबद्दल देवाचे आभार मानले. तसेच मुलाच्या इच्छेसाठी ही कार त्याला गिफ्ट केली असून तो अभ्यासात खूप हुशार असल्याचंही शमसुद्दीन आवर्जून म्हणाले. मोहम्मद तल्हाने या गिफ्टबद्दल बोलताना, "एवढं महाग गिफ्ट मिळाल्याचा आनंद होतोय. पण सध्या मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहे. वडिलांशेजारी बसून नवीन बीएमडब्ल्यू कारमधून आठवड्यातून एकदा फेरफटका मी नक्की मारणार आहे," असं म्हटलंय.

मुलगा नाही चालवणार कार

2.30 कोटी रुपयांची आलिशान कार भेट मिळाल्याने मोहम्मद तल्हाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र परंतु सध्या मोहम्मद तल्हा स्वतः ही कार चालवणार नाही. मोहम्मद तल्हा अजून अल्पवयीन आहे. सध्या मोहम्मद तल्हाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे, त्याचे वडीलच पुढील काही वर्ष ही कार चालवणार आहेत.

भाई जब हमने 10th में टॉप किया था, उस समय मुझे मेरे पापा ने एक साइकल तक गिफ्ट नहीं की थी, और आज इधर जब बेटे ने 9वीं कक्षा में टॉप किया तो पिता ने खुश होकर उसे लगभग ₹2.30 करोड़ रुपए की लग्जरी BMW कार गिफ्ट की ? और सबसे बड़ी बात यह है, कि ये खबर अमेरिका, लंदन और पेरिस की नहीं है, बल्कि अपने भारत के पक्षिम बंगाल की है, जहां के कारोबारी शम्सुद्दीन मिद्दा अपने बेटे की शैक्षणिक परीक्षा में उसे टॉप करता हुआ देख, खुशी से नहीं समाय और खुद मुंबई जाकर उसे ₹2.30 करोड़ रुपए की लग्जरी BMW M4 Competition कार खरीदकर दी, यह पूरा मामला आज सोशल मीडिया पर बड़ी चर्चा का विषय बना हुआ है ?

— Siryansh Yadav (@siryanshyadav) November 6, 2026

नंबर्सचीही हौस

नववीमधील कामगिरीसाठी लेकाला बीएमडब्यू घेऊन देणाऱ्या शमसुद्दीन यांना गाड्यांच्या विशेष नंबर्सचंही आकर्षण आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे स्पेशल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नंबर प्लेट असलेल्या कार्स आहेत. त्यांच्या कारचे शेवटचे चार नंबर 555 असे आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या कार्सचे नंबरही 555 ने संपतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Education News
india