SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एवेन्यू टॉवर्स लिलाव प्रकरण, दिल्ली हायकोर्टाकडून NBCC ला धक्का, हायकोर्टाची नव्या लिलावाला स्थगिती

'ॲव्हेन्यू टॉवर्स' या प्रीमियम गृहप्रकल्पातील 66 सदनिकांच्या नवीन लिलाव प्रक्रियेला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दिल्लीतील सरोजिनी नगर येथे असलेल्या ॲव्हेन्यू टॉवर्स यात अशा 49 सदनिकांचा समावेश आहे, ज्यांच्यासाठी सर्वोच्च बोली लावणाऱ्यांच्या बोली यापूर्वी रद्द करण्यात आल्या होत्या. या खरेदीदारांपैकी आठ जणांनी एनबीसीसीच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 27, 2026, 22:42 IST | Updated: Nov 27, 2026, 23:07 IST
Image Credit: एवेन्यू टॉवर्सच्या लिलावाचं प्रकरण, दिल्ली हायकोर्टाकडून NBCC ला धक्का, हायकोर्टाची नव्या लिलावाला स्थगिती
Join

दिल्लीतील सरोजिनी नगर येथे असलेल्या 'ॲव्हेन्यू टॉवर्स' या प्रीमियम गृहप्रकल्पातील 66 सदनिकांच्या नवीन लिलाव प्रक्रियेला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यात अशा 49 सदनिकांचा समावेश आहे, ज्यांच्यासाठी सर्वोच्च बोली लावणाऱ्यांच्या बोली यापूर्वी रद्द करण्यात आल्या होत्या. या खरेदीदारांपैकी आठ जणांनी एनबीसीसी (NBCC) च्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना NBCC ने या 49 फ्लॅट्ससह एकूण 66 फ्लॅट्ससाठी ई लिलाव प्रक्रिया सुरू केली. खरेदीदारांनी या नवीन लिलाव प्रक्रियेलाही स्थगिती मिळावी म्हणून एक स्वतंत्र याचिका दाखल केली.

हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला :

शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने घरखरेदीदार आणि एनबीसीसी यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की या प्रकरणातील निकाल मंगळवारी 1 डिसेंबर ला दिला जाईल. परंतु घरखरेदीदारांना अंतरिम दिलासा देत न्यायालयाने नवीन लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की लिलाव प्रक्रियेवरील ही स्थगिती पुढील आदेशापर्यंत कायम राहील. न्यायालयाने घरखरेदीदार आणि एनबीसीसी या दोन्ही पक्षांना शनिवारी आपले युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणी याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की  त्यांनी लिलावामध्ये सर्वोच्च बोली लावली होती, जी NBCC ने निश्चित केलेल्या किमान किमतीपेक्षाही (रिझर्व्ह प्राईस) अधिक होती. असे असूनही, त्यांच्या बोली रद्द करण्यात आल्या. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, NBCC ने ही रद्द करण्याची कृती का केली, याचे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. केवळ 'प्रशासकीय कारणे' असे नमूद करून लिलाव रद्द करण्यात आला. त्यांचा आरोप आहे की, NBCC चा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा, मनमानी आणि अन्यायकारक आहे.

सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निर्णयाचा हवाला :

आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा दाखला देत, खरेदीदारांनी असे म्हटले आहे की, केवळ संबंधित प्राधिकरणाला भविष्यात अधिक किंमत मिळण्याची अपेक्षा आहे, या कारणास्तव सर्वोच्च बोली (हायएस्ट बिड) रद्द केली जाऊ शकत नाही. खरेदीदारांच्या मते, लिलाव प्रक्रियेत कोणतीही फसवणूक झालेली नाही. हे पाहता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयांच्या प्रकाशात, सर्वोच्च बोली लावणाऱ्यांना अशा प्रकारे प्रक्रियेतून वगळता येणार नाही. याचिकाकर्त्यांनी असेही नमूद केले आहे की, नवीन लिलावासाठी एनबीसीसीने निश्चित केलेल्या 40,877 रुपये प्रति चौरस फूट या राखीव किमतीवर ते सदनिका खरेदी करण्यास तयार आहेत. हे पाहता नवीन लिलाव आयोजित करण्याची आवश्यकता नाही.

हेही वाचा : 'शरद पवारांच्या NCP सह...', राहुल गांधींचं मोठं विधान; 'आम्ही जीवापाड प्रयत्न करु, पण...'

NBCC चं म्हणणं काय?

एनबीसीसीचे म्हणणे आहे की, या 49 फ्लॅट्ससाठी मिळालेल्या बोली अत्यंत कमी होत्या आणि त्या कंपनीसाठी व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर नव्हत्या. एनबीसीसीने दिल्ली उच्च न्यायालयाला कळवले की, 24 ऑक्टोबर रोजी एकूण 245 फ्लॅट्सचा लिलाव करण्यात आला होता.यांपैकी सर्वाधिक बोलींची सरासरी किंमत प्रति चौरस फूट 54,612 रुपये इतकी होती, तर वादग्रस्त 49 सदनिकांसाठी मिळालेल्या बोलींचे मूल्य प्रति चौरस फूट 40,877  रुपयांपेक्षा कमी होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तुलनात्मक मूल्यमापन केल्यानंतर या बोली व्यावसायिकदृष्ट्या समाधानकारक आढळल्या नाहीत. या आधारावर त्या 49 सदनिकांसाठीच्या बोली रद्द करण्यात आल्या.

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या प्रतिसादात एनबीसीसीने नमूद केले आहे की, या लिलावाचा उद्देश फ्लॅट्सच्या विक्रीतून जास्तीत जास्त महसूल मिळवणे हा आहे. 'ॲव्हेन्यू टॉवर्स'च्या (Avenue Towers) लिलावातून मिळणारी रक्कम सात जीपीआरए (GPRA) वसाहतींच्या पुनर्विकासासाठी वापरली जाणार आहे. हा निधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासी वसाहतींच्या गैर-व्यावसायिक बांधकामा पूर्ण करण्यास मदत करेल. एनबीसीसी च्या म्हणण्यानुसार सदनिकांच्या पुनर्लिलावावर स्थगिती असल्याने प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.

कंपनीने असाही युक्तिवाद केला आहे की केवळ सर्वोच्च बोली लावणे किंवा राखीव किमतीवर बोली लावणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला फ्लॅट मिळण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होतो असे नाही. जोपर्यंत अलॉटमेंट लेटर जारी केले जात नाही, तोपर्यंत फ्लॅटचा व्यवहार पूर्ण झाला असे मानले जाऊ शकत नाही. 'झी न्यूज'च्या एका वृत्तानंतर एनबीसीसी ने एक शुद्धिपत्रक (corrigendum) जारी केले होते

झी न्यूजने या विषयावर प्रमुख बातमी दिल्यानंतर, सरकारी कंपनी एनबीसीसीने आपली चूक सुधारत एक शुद्धिपत्रक जारी केले. 6 नोव्हेंबर रोजी जेव्हा एनबीसीसीने 66 सदनिकांच्या नवीन लिलावासाठी अर्ज मागवले होते, तेव्हा संभाव्य खरेदीदारांना हे सांगण्यात आले नव्हते की या मालमत्तेबाबत न्यायालयात वाद प्रलंबित आहे. एनबीसीसीने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये असे नमूद केले होते की, या जमीन किंवा मालमत्तेबाबत कोणत्याही न्यायालयात कोणताही खटला प्रलंबित नाही.

मात्र, वस्तुस्थिती अशी होती की, त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने काही खरेदीदारांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात एनबीसीसीला नोटीस बजावून उत्तर मागितले होते. इतकेच नव्हे, तर लिलावाच्या नवीन प्रक्रियेत एनबीसीसीने मागील लिलावातील सर्वोच्च बोली लावणाऱ्यांना सहभागी होण्याची संधीही दिली नव्हती.

'झी न्यूज'ने जेव्हा एनबीसीसीच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आणि आपल्या वृत्ताद्वारे ही तथ्ये समोर आणली, तेव्हा कंपनीने एक नवीन शुद्धिपत्रक (corrigendum) जारी केले. या शुद्धिपत्रकात, एनबीसीसीने संभाव्य खरेदीदारांना कळवले की, काही युनिट्सशी संबंधित प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्यांनी लिलावात सहभागी होण्याचा निर्णय स्वतःच्या जोखमीवर घ्यावा. कंपनीने असेही स्पष्ट केले की, कोणत्याही नुकसानीच्या किंवा दाव्याच्या प्रसंगी ती जबाबदारी स्वीकारणार नाही. त्याच शुद्धिपत्रकात, एनबीसीसीने अधिक स्पष्ट केले की, मागील लिलावातील सर्वोच्च बोलीदारांना आता नवीन लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES