SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हनीट्रॅपमध्ये अडकला वायुसेनेचा अधिकारी? न्यूड फोटोच्या बदल्यात भारताचे युद्धनियोजन पाकिस्तानला दिले?

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हनीट्रॅपमध्ये अडकून भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडरने गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रातून युद्धनियोजन, ड्रोन क्षमता आणि स्पायवेअरबाबत महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 15, 2026, 04:09 PM IST | Updated: Nov 15, 2026, 04:23 PM IST
Image Credit: आयएएफ अधिकारी हनीट्रॅपमध्ये
Join

भारतीय वायुसेनेतील एका विंग कमांडरवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित महिलेला देशाच्या सुरक्षेशी निगडित गोपनीय माहिती दिल्याचा गंभीर आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले आहे. संबंधित अधिकारी 44 वर्षांचा असून त्याचे नाव सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक करण्यात आलेले नाही. जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत तो संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आलंय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

सोशल मीडियावरील ओळखीतून सुरू झाला हनीट्रॅप

संबंधित अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी सुरू असताना एका महिलेने त्याच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला चुकीच्या क्रमांकावर मेसेज पाठवल्याचे सांगून संवाद सुरू झाला. संबंधित महिला मानसिक तणावात असल्याचे सांगत समुपदेशनासाठी मदत मागत होती. यानंतर दोघांमध्ये हळूहळू जवळीक निर्माण झाली. त्यानंतर व्हॉट्सॲप आणि अन्य डिजिटल माध्यमांवरून संवाद सुरू झाला, असे तपास यंत्रणांच्या माहितीतून समोर आलंय. या महिलेचा संबंध पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेशी होता, असं पोलिसांनी सांगितलंय.

खासगी फोटोच्या बदल्यात गोपनीय माहिती 

संबंधित महिलेने अधिकाऱ्याला खासगी स्वरूपाचे फोटो पाठवले. त्यानंतर त्याने भारतीय वायुसेनेच्या युद्धनियोजनाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांचा काही भाग तिला पाठवल्याचा आरोप आहे. प्रत्येक खासगी फोटोच्या बदल्यात युद्धनियोजनाच्या कागदपत्रांमधील आणखी माहिती देण्याचे आश्वासनही त्याने दिल्याचे तपासात नमूद आहे. ड्रोनची क्षमता, वायुसेनेच्या कारवाया आणि लष्करी तैनातीसंबंधी माहिती शेअर केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

सहकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये स्पायवेअर?

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये मालवेअर इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला.यामुळे अन्य संरक्षण कर्मचाऱ्यांची माहिती मिळवणे, डिजिटल संवादावर नजर ठेवणे किंवा उपकरणांमधील डेटा चोरणे शक्य झाले असते, असे  तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून अन्य कर्मचाऱ्यांच्या उपकरणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला का?, याचाही तपास करण्यात आला.

अधिकृत गुपिते कायद्यांतर्गत कारवाई

या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी संबंधित विंग कमांडरविरोधात ऑफिशियल सिक्रेट एक्ट्स अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र पटियाला हाऊस न्यायालयासमोर असून खटला पुढे चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी अद्याप मिळणे बाकी आहे. न्यायालयाने ही मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES