• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /शहरं झाली गॅस चेंबर! मुंबई, दिल्लीतील हवा झाली विषारी, श्वास घेणंही धोकादायक; महानगरांचा AQI पाहून बसेल धक्का

शहरं झाली गॅस चेंबर! मुंबई, दिल्लीतील हवा झाली विषारी, श्वास घेणंही धोकादायक; महानगरांचा AQI पाहून बसेल धक्का

फटाक्यांमुळे दिल्ली आणि मुंबईची हवा बनली विषारी. अनेक ठिकाणची हवा अंत्यत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 09, 2026, 08:43 IST|Updated: Nov 09, 2026, 08:46 IST
joinshare
शहरं झाली गॅस चेंबर! मुंबई, दिल्लीतील हवा झाली विषारी, श्वास घेणंही धोकादायक; महानगरांचा AQI पाहून बसेल धक्का
Image Credit: Diwali Crackers Leave Delhi and mumbai Gasping As AQI Soars mumbai pollution

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फटाके फोडण्यावर निर्बंध, प्रदूषणाचा वाढता धोका याबाबत वेळोवळी चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसंच, हायकोर्टाने प्रदूषणाबाबत जनजागृती करण्याचे आदेशही दिले होते. मात्र या साऱ्या उपाययोजना धाब्यावर बसवत मुंबईकरांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटाक्यांची आतिषबाजी केली. याचा परिणाम म्हणजे दीपोत्सवानंतर मुंबईतील हवेचा स्तर  खालावला आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. तर दिल्लीतही हिच परिस्थिती आहे. दिल्ली - NCR मधील वायू प्रदूषणाची स्थितीही अत्यंत गंभीर श्रेणीत आहे.

मुंबईतील हवा प्रदूषणाची तापळी चिंताजनक होत चालली आहे. पहाटेच्या आकडेवारीनुसार  आज मुंबईचा एक्यूआय (एअर क्वालिटी इंडेक्स) 192 वर पोहोचला आहे. काही ठिकाणी तर हवा अत्यंत अस्वस्थ श्रेणीत असल्याचा दर्जा नोंदवण्यात आला आहे.

विभागनिहाय आकडेवारीत शिवाजीनगर, मलाड आणि चेंबूरचा एक्यूआय 200 च्या वर आहे.
मुख्य प्रदूषकांमध्ये PM2.5 चा स्तर 107 µg/m³ आणि PM10 चा स्तर 157 µg/m³ इतका नोंदवला गेला आहे. जो आरोग्यासाठी घातक मानला जातो. त्यामुळं नागरिकांनी मास्क घालूनच बाहेर पडावे, असं अवाहन करण्यात येत आहे.

मुंबईतील हवेचा स्तर

कलानगर- 264
बीकेसी-231
देवनार-226
घाटकोपर-221
चेंबूर-216
कुलाबा-213
मलाड-213
सायन-1221
वरळी-148

दिल्लीची हवा बनली विषारी

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही दिल्लीत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत कायम आहे. दिल्लीचा सरासरी AQI 366 नोंदवण्यात आला आहे. मागील दिवसाच्या तुलनेत त्यात किंचित घट झाली असली, तरी हवेतील प्रदूषणाची पातळी अजूनही चिंताजनक आहे. दिवाळीनंतरही दिल्ली-NCR मधील हवेतील प्रदूषणाची पातळी चिंताजनक असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दिल्लीतील प्रमुख भागांचा AQI:

बवाना – 424
बुराडी – 445
चांदणी चौक – 418
DTU – 431
ITO – 404
जहांगीरपुरी – 439
मुंडका – 413
NIH नरेला – 408
पंजाबी बाग – 408
पटपडगंज – 418
रोहिणी – 435
सोनिया विहार – 449
विवेक विहार – 441

दिल्ली-NCR मध्येही प्रदूषणाची गंभीर स्थिती

नोएडा – 338
गुरुग्राम – 312
गाझियाबाद – 368
फरिदाबाद – 329

मुंबई-दिल्ली बनतेय गॅस चेंबर

मुंबई आणि दिल्ली एक आर्थिक राजधानी तर एक देशाची राजधानी. या दोन्ही महत्त्वाच्या  शहरांमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली असून, सध्या ही शहरे 'गॅस चेंबर' बनत चालली आहेत. दोन्ही शहरातील हवेची गुणवत्ता अथ्यंत खराब व धोकादायक श्रेणीत पोहोचली आहे. हवेचा खालावणारा दर्जा पाहता नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. फटाक्यांमधून निघणारे सूक्ष्म कण यामुळं श्वास घेण्याच्या समस्या वाढतात. लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींना याचा जास्त धोका असतो.

दरम्यान, प्रदुषण वाढत असताना मुंबईकरांना फटाके न फोडण्याचे अवाहन करण्यात आले होते. कोर्टानेही रस्ते, गल्ल्या, पदपथ (फूटपाथ) अशा सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रशासनाने प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या मदतीने व्यापक जनजागृती करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे.

पुण्यातही हवेची गुणवत्ता घसरली

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यामुळे हवेची गुणवत्ता घसरली असून गुणवत्ता श्रेणी वाईट नोंदवली आहे. फटाक्यामुळे चौफेर धुराचे लोट तयार झाल्याने प्रदूषण वाढल्याच  पाहायला मिळाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर मध्ये हवेचा गुणवंता निर्देशांक 204 नोंदवला असून तो वाईट श्रेणीतला आहे.  दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसाच्या निरीक्षणामध्ये काल लक्ष्मीपूजन दिवशी सर्वाधिक वायू प्रदर्शन नोंदवले गेले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News
Pune News