दिवाळीला सुट्टी असूनही फक्त 60 मिनिटांसाठी उघडणार शेअर बाजार; मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर
सोनं खरेदी प्रमाणेच दिवाळीच्या काळात शेअर्स खरेदी करणे ही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची एक परंपरा आहे. 8 नोव्हेंबर, दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचे मुहूर्त ट्रेडिंगचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
शेअर बाजार : दिवाळीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. शेअर बाजार देखील बंद असतो. मात्र, दर्वर्षी सुट्टी असूनही फक्त 60 मिनिटांसाठी शेअर बाजार उघडतो. यादम्यान शेअर्सची खरेदी-विक्री होते. या विशेष सत्राला 'मुहूर्त ट्रेडिंग' असे म्हणतात. यंदाचा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर झाला आहे.
भारतात दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. सोनं चांदीच्या खरेदीसह शेअर बाजारात गुंतवणूक करणारे देखील दिवाळीच्या या खास मुहूर्त ट्रेडिंगची वाट पाहत असतात. दिवाळी हा ट्रेंडिंगसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. पूजा करण्याची आणि नवीन व्यावसायिक वर्षाचे स्वागत करण्याची ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
दिवाळीच्या काळात शेअर्स खरेदी करणे ही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची एक परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार थोड्या काळासाठी खुला राहील. बीएसई आणि एनएसई या दोन्ही एक्सचेंजवर व्यवहार होणार आहेत. या काळात गुंतवणूकदारांना त्यांचे आवडते शेअर्स खरेदी करता येणार आहेत.
शेअर बाजार फक्त एका तासासाठी उघडणार
यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दुपारची आहे. 8 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन दिवशी दुपारी 2:20 ते 3:30 पर्यंत मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आहे. दुपारी 2:05 वाजता एक पूर्व-सत्र सुरू होणार आहे. 8 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताच्या व्यापारासाठी एक्सचेंज उघडा राहणार आहे. सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी दिवाळी-बलिप्रतिपदा निमित्त बीएसई आणि एनएसई दोन्ही बंद राहतील. यानंतर24 नोव्हेंबर रोजी प्रकाश गुरुपर्वानिमित्तही एक्सचेंज बंद राहणार आहेत.
दिवाळीपूर्वीच शेअर बाजारांत तेजी
दिवाळीपूर्वीच शेअर बाजारांत तेजी पहायला मिळाली. 6 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारांने सलग सातव्या दिवशी मोठी उसळी घेतली होती. निफ्टी 2.01 टक्क्यांनी, म्हणजेच 493.75 अंकांनी वाढून 25,030 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 2.17 टक्क्यांनी, म्हणजेच 1,718 अंकांनी वाढून 81,028 वर बंद झाला. शेअर बाजारात सकारात्माक चित्र असल्याने 'मुहूर्त ट्रेडिंग' साठी गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे.