• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /भारताच्या हवामानात भयानक बदल; 20 राज्यांना IMD अलर्ट; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय

भारताच्या हवामानात भयानक बदल; 20 राज्यांना IMD अलर्ट; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय

Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 11 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान ): बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 20 राज्यांना IMD ने अलर्ट दिला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 10, 2026, 23:03 IST|Updated: Nov 10, 2026, 23:15 IST
joinshare
भारताच्या हवामानात भयानक बदल; 20 राज्यांना IMD अलर्ट; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

11 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान : बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या हवामानात भयानक बदल होणार आहे. 20 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. 11 नोव्हेंबर रोजी या 20 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  या काळात ताशी 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 

आग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत वायव्य भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.  मुसळधार पावसामुळे थंडीची जोर वाढू शकतो. 

20 राज्यांना अलर्ट

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आसाम, सिक्कीम आणि त्रिपुरा या 20 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. 

दरम्यान, बंगालच्या उपसागरात नवी हवामान प्रणाली विकसित होत आहे.  असलेली एक हवामान प्रणाली पुढील आठवड्यात चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.  तामिळनाडूमध्ये ईशान्य मोसमी पावसाने जोर धरला आहे.  चेन्नई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने (आरएमसी) रामनाथपुरम आणि तुतीकोरीन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

12 नोव्हेंबरच्या सुमारास आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या नवीन कमी दाबाच्या क्षेत्राकडे वळले आहे. हवामान अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, ही प्रणाली हळूहळू मजबूत होऊन 15 नोव्हेंबरपर्यंत शेजारील श्रीलंकेच्या दिशेने सरकू शकते.  ही प्रणाली आणखी मजबूत होऊ शकते आणि तिचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Weather
Weather News