• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /EPFOचा मोठा बदल! UPIवरून थेट PFचे पैसे कधीपासून काढता येणार? मोठी अपडेट

EPFOचा मोठा बदल! UPIवरून थेट PFचे पैसे कधीपासून काढता येणार? मोठी अपडेट

सध्या PF काढण्यासाठी सदस्यांना यूएएन पोर्टलवर ऑनलाइन दावा दाखल करावा लागतो.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 08, 2026, 09:23 PM IST|Updated: Oct 08, 2026, 09:39 PM IST
joinshare
EPFOचा मोठा बदल! UPIवरून थेट PFचे पैसे कधीपासून काढता येणार? मोठी अपडेट
Image Credit: सध्या PF काढण्यासाठी सदस्यांना यूएएन पोर्टलवर ऑनलाइन दावा दाखल करावा लागतो. दावा मंजूर झाल्यानंतर ईपीएफओकडून रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली जाते. नव्या व्यवस्थेत यूएएन पोर्टल आणि सदस्याचे UPI खाते जोडण्याची योजना आहे. त्यामुळे पीएफमधून पात्र रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होण्याची अपेक्षा आहे. या सुविधेची सध्या बँकांसोबत चाचणी सुरू आहे.

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि डिजिटल करण्याच्या दिशेने ईपीएफओने मोठे पाऊल उचलले आहे. UPIच्या माध्यमातून पीएफमधील पात्र रक्कम काढण्याच्या सुविधेची काही बँकांसोबत चाचणी सुरू झाली आहे. ही सुविधा डिसेंबर 2026 अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध झालेली नाही.

UPIद्वारे PF काढण्याची सुविधा

सध्या PF काढण्यासाठी सदस्यांना यूएएन पोर्टलवर ऑनलाइन दावा दाखल करावा लागतो. दावा मंजूर झाल्यानंतर ईपीएफओकडून रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली जाते. नव्या व्यवस्थेत यूएएन पोर्टल आणि सदस्याचे UPI खाते जोडण्याची योजना आहे. त्यामुळे पीएफमधून पात्र रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होण्याची अपेक्षा आहे. या सुविधेची सध्या बँकांसोबत चाचणी सुरू आहे.


डिसेंबरअखेरपर्यंत अधिकृत सुरुवात?

ईपीएफओने यूपीआयद्वारे पीएफ काढण्याची सुविधा अद्याप अधिकृतपणे सुरू केलेली नाही. उपलब्ध माहितीनुसार, चाचणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2026च्या अखेरपर्यंत ही सुविधा सुरू करण्याचे लक्ष्य आहे. मात्र अंतिम तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सध्या सदस्यांनी UPIच्या माध्यमातून तात्काळ पीएफ काढता येईल, असे समजू नये.

संपूर्ण पीएफ रक्कम काढता येणार नाही

UPI सुविधा सुरू झाली तरी सदस्यांना आपल्या पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम मनाप्रमाणे काढता येणार नाही. प्रस्तावित व्यवस्थेनुसार, पात्रता आणि लागू नियमांच्या अधीन राहून जास्तीत जास्त 75 टक्क्यांपर्यंत EPF रक्कम काढता येऊ शकते. किमान 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवावी लागेल. शिक्षण, विवाह आणि घराशी संबंधित काही गरजांसाठी आंशिक पैसे काढण्याची तरतूद लागू राहणार आहे. खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमेवर करमुक्त व्याज मिळत राहील.

नवीन अ‍ॅपचीही तयारी

पीएफ व्यवहार अधिक डिजिटल करण्यासाठी ईपीएफओकडून नवीन अ‍ॅप विकसित करण्याचीही तयारी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे अ‍ॅप सदस्यांच्या बँक खात्याशी जोडले जाऊ शकते. तसेच BHIM आणि इतर यूपीआय अॅप्सशी जोडणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे PFशी संबंधित सेवा आणि पैसे काढण्याची प्रक्रिया एका डिजिटल व्यवस्थेत आणण्याचा ईपीएफओचा प्रयत्न आहे.

ईपीएफओचा मोठा निधी आणि कोट्यवधी सदस्य

ईपीएफओकडे सध्या सुमारे 30 कोटी सदस्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे 7.5 कोटी सदस्य नियमितपणे योगदान देणारे असल्याचे सांगण्यात येते. ईपीएफओच्या एकूण निधीचा आकार जवळपास ₹26 लाख कोटी आहे. त्यामुळे यूपीआयसारख्या डिजिटल सुविधेमुळे मोठ्या संख्येने सदस्यांना पीएफशी संबंधित व्यवहार अधिक सोप्या पद्धतीने करता येण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम नियम, पात्रता आणि सुविधा सुरू होण्याची अधिकृत तारीख EPFOकडून स्पष्ट झाल्यानंतरच निश्चित माहिती मिळेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Personal Finance
Finance News