• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /ला इलाहा इल्लल्लाह... 7 वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या कट्टर हिंदू नेत्याचे भर सभेत इस्लामचे कलमा पठण; कारण जाणून सगळेच शॉक

ला इलाहा इल्लल्लाह... 7 वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या कट्टर हिंदू नेत्याचे भर सभेत इस्लामचे कलमा पठण; कारण जाणून सगळेच शॉक

भाजपच्या कट्टर हिंदू नेत्याने भर सभेत इस्लामचे कलमा पठण केले आहे. राजस्थानात हा प्रकार घडला आहे. यामुळे सगळेच अचंबित झाले.

Written ByVanita KambleEdited ByVanita Kamble
Published: Nov 15, 2026, 05:14 PM IST|Updated: Nov 15, 2026, 05:25 PM IST
joinshare
ला इलाहा इल्लल्लाह... 7 वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या कट्टर हिंदू नेत्याचे भर सभेत इस्लामचे कलमा पठण; कारण जाणून सगळेच शॉक

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राजेंद्र राठोड : भाजप हा हिंदूत्वाचा अजेंडा चालवाणार पक्ष आहे. भाजपचे अनेक नेते कट्टर हिंदू आहेत. भाजपच्या बड्या कट्टर हिंदू नेत्याने भर सभेत इस्लामचे कलमा पठण केले आहे. यामुळे सगळेच शॉक झाले आहेत. हा नेता तब्बल 7 वेळा आमदार राहिला आहे. राजस्थानात हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सुनेचा प्रचार करताना घेतलेल्या  प्रचार सभेत या नेत्याने कलमा पठण करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 

राजेंद्र राठोड असे या नेत्याचे नाव आहे. राजेंद्र राठोड हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. इतकचं नाही तर ते राजस्थानचे सात वेळा आमदार राहिलेले आहेत.  राजस्थानमधील चुरू येथे एका जाहीर सभेत त्यांनी इस्लाममधील पहिल्या कलमाचे पठण केले. राजेंद्र राठोड यांची सून कनिका सिंह या चुरू जिल्हा परिषद निवडणुकीत वॉर्ड 23 मधून निवडणूक लढवत आहेत. सुनेच्या प्रचारासाठी राजेंद्र राठोड स्वत: मैदानात उतरले आहेत. 

कनिका सिंग यांनी देखील 'अस्सलामु अलैकुम' म्हणत लोकांशी संवाद साधला.  ज्या प्रभागातून त्या निवडणूक लढवत आहेत, तिथे मोठ्या संख्येने कायमखानी मुस्लिम राहतात. कनिका व्यतिरिक्त, तिचे पती आणि भाजप नेते राजेंद्र राठोड यांचे पुत्र पराक्रम राठोड हे देखील चुरू जिल्हा परिषदेच्या प्रभाग 39 मधून निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेसची टीका

काँग्रेसने राठोड यांच्यावर टीका केली आहे.  समाजात फूट पाडणे ही आरएसएस आणि भाजपची विचारधारा आहे.  लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही अल्पसंख्याक उमेदवारांना तिकीटही देत ​​नाहीत असा आरोप पक्षाचे प्रवक्ते स्वर्णिम चतुर्वेदी यांनी केला आहे.

कोण आहेत राजेंद्र राठोड ?

राजेंद्र राठोड  हे  1990 ते 2023 या काळात सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1990 मध्ये, त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर चुरू मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर, ते 1993, 1998, 2003, 2008, 2013 आणि 2018 मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले.  माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटचे सहकारी मानले जातात. त्यांनी 2013-18 या काळात राजस्थान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
Indian Politics
Political News