SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिवाळीआधीच ग्राहकांना धक्का, सोनं-चांदीच्या दरात मोठे उलटफेर, वाचा 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव

आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली व किती घट झाली, हे जाणून घेऊयात सविस्तर

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 02, 2026, 10:52 AM IST | Updated: Nov 02, 2026, 11:02 AM IST
Image Credit: Gold Rate Today,
Join

2 नोव्हेंबर रोजी सोनं आणि चांदीच्या दरात तेजी आल्याचे पाहायला मिळतेय. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरांत वाढ होण्याची शक्यता असल्याने मौल्यवान धातुच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. महागाईचा दबाव असताना अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने अलीकडेच त्यांच्या प्रमुख व्याज दरात कोणतेही बदल केले नाहीत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठे उलटफेर झाले असून आज सोन्याच्या दरात किंचीत वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर एक वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहोचले होते. चांदीचा भावदेखील नोव्हेंबर 2025नंतर पहिल्यांदा 50 डॉलर प्रति औंसवर खाली घसरला आहे. वाढती किंमत आणि महागाई यामुळं अमेरिकामध्ये व्याज दर काही काळासाठी स्थिर राहू शकतात, असा अंदाज आहे. सोमवारी 9.31 वाजण्याच्या सुमारास सोन्याचा भाव 0.40 टक्क्यांनी वाढून 1,39,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, चांदीची किंमत जवळपास 1.15 टक्क्यांनी वाढून 1,82,250 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे.

देशाच्या विविध शहरांत सोनं आणि चांदीच्या किंमतीत फरक असल्याचे दिसून येते. याचे कारण स्थानिक कर, मागणी आणि अन्य खर्च असू शकतात. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,98,900 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,325 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावला आहे. त्याचबरोबर 999 शुद्धतेची चांदीची किंमत 1,81,610 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.

मुंबईत सोनं-चांदीचा भाव

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,38,990 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,408 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. चांदीचा भाव 1,81,930 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे.

प्रतितोळा सोन्याचा भाव

24 कॅरेट -13,937
22 कॅरेट- 12,775  
18 कॅरेट- 10,453

या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे 5.9 टक्क्यांनी घसरण झाली असून, सलग दुसऱ्या महिन्यात सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली आहे. स्पॉट मार्केटमध्ये चांदीचे दर 5.8 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 49.34 डॉलरवर आले, जी नोव्हेंबर 2025 नंतरची नीचांकी पातळी आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES