• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /ग्वालियरमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान मोठा अपघात, 41 भाविकांचा ट्रकने उडवलं, 15 जणांचा मृत्यू

ग्वालियरमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान मोठा अपघात, 41 भाविकांचा ट्रकने उडवलं, 15 जणांचा मृत्यू

Gwalior Accident : ग्वालियरच्या SSP धर्मवीर सिंहने सांगितलं की यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 39 श्रद्धाळूंना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

Reported Bypooja pawar
Published: Oct 18, 2026, 11:40 AM IST|Updated: Oct 18, 2026, 12:38 PM IST
joinshare
ग्वालियरमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान मोठा अपघात, 41 भाविकांचा ट्रकने उडवलं, 15 जणांचा मृत्यू
Image Credit: gwalior accident news 2026 latest : . ग्वालियरच्या SSP धर्मवीर सिंहने सांगितलं की यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 39 श्रद्धाळूंना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gwalior Accident : मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये शीतला माता मंदिराच्या रस्त्यावर एक मोठा अपघात घडला. नवरात्रउत्सवाच्या दरम्यान मोठ्या संख्येने श्रद्धाळू मंदिरात दर्शनासाठी जात होते. यावेळी धान्याने भरलेल्या एका ट्रकने 41 श्रद्धाळूंना चिरडलं. ग्वालियरच्या SSP धर्मवीर सिंहने सांगितलं की यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 39 श्रद्धाळूंना रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांमध्ये दोन पोलिसांचा सुद्धा समावेश आहे जे यावेळी तेथे ड्यूटीवर उपस्थित होते.

अपघात झाल्यावर SSP धर्मवीर सिंग यांनी सांगितले की छिनोरच्या दिशेकडून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतार आहे. या मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई आहे. पहाटे दीडच्या सुमारास भाताने भरलेला एक ट्रक तिथे थांबवण्यात आला होता. मात्र तो ट्रक पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून अचानक अनियंत्रित झाला आणि उतारावरून खाली गेला. त्यानंतर तो मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आणि प्रवेशद्वारावर जाऊन आदळला. या अपघातात रस्त्यावर उपस्थित असलेले भाविक ट्रकखाली अडकले.

41 जणांना रुग्णालयात केलं दाखल :

SSP ने सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकूण 41 जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला आहे. पाच ते सहा रुग्णांना गंभीर दुखापत झाली असून त्यात हाडे मोडलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित जखमींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

कसा झाला अपघात?

ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी सांगितले की, पहाटे दीडच्या सुमारास एक ट्रक अनियंत्रित झाल्याची माहिती मिळाली होती. ही बातमी मिळताच रुग्णवाहिका आणि इतर वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 39 जण जखमी झाले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, जखमींच्या दुखापतींचे स्वरूप समजून घेण्यासाठी सीटी स्कॅन आणि एक्स - रे चाचण्या केल्या जात आहेत. ज्यामुळे त्यांच्या वैद्यकीय उपचारांत मदत होईल.

ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, नवरात्रीनिमित्त रस्त्यावर बॅरिकेड्स आणि पोलिसांची तपासणी नाके उभारण्यात आली होती. ट्रक या अडथळ्यांना तोडून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत कसा पोहोचला, याचा तपास केला जाईल. ट्रकची तांत्रिक तपासणी करण्यासाठी आरटीओ (RTO) पथकाला पाठवण्यात आले आहे. हे पथक वाहनात काही तांत्रिक बिघाड होता का आणि डावीकडे वळताना वाहन कसे अनियंत्रित झाले, याची पडताळणी करेल. प्रशासन या अपघाताची कारणे तसेच सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित बाबींचा तपास करत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Marathi Batmya
News in Marathi