उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बद्रीनाथ धामहून परतणारे एक हेलिकॉप्टरचा मागील काही तासापासून शोध घेत होते. या ठिकाणी हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर लगेचच शोधकार्य सुरु केले होते. आता अशी माहिती समोर आली आहे की बद्रीनाथवरुन येणारं विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची बातमी मिळताच प्रशासनाने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले होते. नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
जोशीमठजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त समोर आले. या अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार बर्फवृष्टी होत असताना हेलिकॉप्टरने बद्रीनाथ मंदिरावरून उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळताच लष्कर आणि स्थानिक पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण सहा जण होते. बचाव पथक आल्यानंतरच वाचलेल्यांविषयी माहिती मिळू शकेल. चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी सांगितले की, लष्कराने प्रशासनाला या घटनेची माहिती दिली, त्यानंतर प्रशासनाने हेलिकॉप्टरचे ठिकाण शोधून अपघाताची पुष्टी केली.
हे ही वाचा
चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी या घटनेची माहिती दिली आहे आणि यावेळी ती म्हणाले की, लष्कराने प्रशासनाला या घटनेची माहिती दिली होती त्यानंतर हेलिकॅाप्टरचे ठिकाण शोधून ते कोसळ्याची पुष्टी करण्यात आली आहे. बचाव पथक आल्यानंतरच पीडितांविषयी माहिती उपलब्ध होईल. चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी सांगितले की, लष्कराने प्रशासनाला या घटनेची माहिती दिली होती, त्यानंतर प्रशासनाने हेलिकॉप्टरचे ठिकाण शोधून ते कोसळल्याची पुष्टी केली.
#WATCH | Uttarakhand: A team from the district administration is currently searching for the missing helicopter travelling from Badrinath to Dehradun. Smoke was seen rising near Chaien village in Joshimath, following the disappearance of the helicopter. There are six people on board the helicopter, including five passengers and one pilot: Chamoli district administration
— ANI (@ANI) October 30, 2026
घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. सोशल मिडियावर एक्सवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, "जोशीमठ येथील चाई गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी बातमी आम्हाला मिळाली आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफ संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत." पुढे त्यांनी सांगितले की ते स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, त्यांनी गंभीर जखमींना चांगल्या उपचारांसाठी तातडीने उंच केंद्रात हवाई मार्गाने हलवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शोक व्यक्त केला.