• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीची नवी रणनीती; राहुल गांधीचा जबरदस्त प्लान

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीची नवी रणनीती; राहुल गांधीचा जबरदस्त प्लान

देशातील निवडणूक प्रक्रिया उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढाई सुरू राहणार. इंडिया आघाडीची रणनीती ठरली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 13, 2026, 08:22 PM IST|Updated: Oct 13, 2026, 08:29 PM IST
joinshare
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीची नवी रणनीती; राहुल गांधीचा जबरदस्त प्लान

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

2

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

3

20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

4

काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

5

भाजपाचा मोठा निर्णय! राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

इंडिया आघाडी : दिल्लीत राहुल गांधींच्या निवासस्थानी चहापानचा कार्यक्रम झाल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निशाणा साधला. भाजपविरोधात आमच्या सगळ्यांची एकजूट असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. तसंच संविधानाचं रक्षण करणं हाच आमचा आंदोलनाचा उद्देश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

इंडिया आघाडी मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलनाचा धडाका सुरू आहे. दरम्यान आज झालेल्या 'टी डिम्लोमसी'त इंडिया आघाडीनं त्यांची पुढची रणनीती ठरवली आहे. 

इंडिया आघाडीनं ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मागील 6 दिवसांपासून दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू होतं. आज दिल्लीत इंडिया आघाडीनं बैठकीत पुढची रणनीती ठरवण्यात आली आहे. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत इंडियाचा एल्गार सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाची तीव्रता कमी न होऊ देता वाढवली पाहिजे यावर बैठकीत चर्चा झाली.  

ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवलं जाणार आहे. आंदोलनात केवळ राजकीय पक्ष नाही तर सामाजिक संघटना देखील सहभागी असल्या पाहिजे. आंदोलनात केवळ निवडणूक आयोग नाही तर सरकारला देखील धारेवर धरले जाणार. 

इंडिया आघाडी अमित शाहांच्या घरासमोर आंदोलन करणार? 

इंडिया आघाडी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरासमोर आंदोलन करण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊतांकडून याबाबत आंदोलन करण्याचे संकेत देण्यात आलेत. मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं, तसंच शाहांच्या घरासमोरही आंदोलन करू शकतो असं राऊतांनी म्हटलंय. 

राहुल गांधींनी मानले आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार

सुप्रीम कोर्टावरील मोर्चात सहभागी झालेल्यांचे राहुल गांधी यांनी आभार मानलेत. आंदोलनाला पाठिंबा देणा-यांचेही राहुल गांधींनी आभार व्यक्त केले. तसंच राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. इंडिया आघाडीतील एकजुटीचं बैठकीत कौतुक करण्यात आलं. आमची लढाई थांबणार नाही. आम्ही शेवटपर्यंत लढणार. महाराष्ट्रातून ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील दिल्लीत जात एल्गार पुकारला. संविधान वाचवण्यासाठी लढाई सुरूच राहणार असल्याचा निर्धार  सुप्रिया  सुळे यांनी केला आहे. तर संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
दिल्लीसह प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात इंडिया आघाडी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. 

पुढचं आंदोलन इंडिया आघाडी कुठे करणार आहे  आणि कधी करणार आहे  देखील सध्या गुलद्स्त्यात ठेवण्यात आलं आहे. निवडणूक आयोग, जंतरमंतर, राजघाट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढल्यानंतर इंडिया आघाडी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे. त्यासाठी रणनीती ठरली आहे. मात्र आंदोलनाचा वार, तारीख आणि वेळ गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Indian Politics