• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान हायजॅकची धमकी, टेकऑफच्या काही मिनिटांपूर्वी..; 5 क्रू मेंबर अन् 108 प्रवाशांचा...

मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान हायजॅकची धमकी, टेकऑफच्या काही मिनिटांपूर्वी..; 5 क्रू मेंबर अन् 108 प्रवाशांचा...

मुंबईला येणाऱ्या 5 क्रू मेंबर आणि 108 प्रवाशी असलेल्या एअर इंडियाच्या विमानातील टॉयलेटच्या आरशावर विमान हायजॅक धमकीचा मेसेज पाहून एकच थरकाप उडाला.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 11, 2026, 17:40 IST|Updated: Nov 13, 2026, 15:41 IST
joinshare
मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान हायजॅकची धमकी, टेकऑफच्या काही मिनिटांपूर्वी..; 5 क्रू मेंबर अन् 108 प्रवाशांचा...
Image Credit: kolkata to mumbai

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

एअर इंडियाच्या विमानामध्ये अचानक 'हायजॅक'च्या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. कोलकाता विमानतळावर ही घटना घडली. कोलकाताहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानामधील टॉयलेटच्या आरशावर हायजॅक हा मेसेज लिहिल्याचे आढळून आले. यावेळी विमानात 5 क्रू मेंबरसह 108 प्रवाशी होते.

विमानाचे टेक-ऑफ होण्याच्या अवघ्या काही मिनिटे आधी एका कर्मचाऱ्याला विमानाच्या टॉयलेटमधील आरशावर 'विमान हायजॅक होणार' अशी धमकी लिहिलेली दिसून आली. यानंतर तातडीने सतर्कतेचा अर्लट देण्यात आला. हा अर्लट मिळताच विमानाचे उड्डाण तातडीने थांबवण्यात आले. त्यानंतर त्या विमानाला स्वतंत्र आयसोलेशन बे मध्ये हलवण्यात आले. ही भयानक घटना नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडल्याची नोंद झाली आहे. 

कोलकाता इथून मुंबईसाठी सकाळी 10.30 ची एअर इंडिया  AI 2772 / A320 टेकऑफसाठी रेडी होती. या विमानात त्यावेळी 5 क्रू मेंबरसह 108 होते. विमानाने टेक-ऑफ घेण्यापूर्वी केबिन क्रूची नेहमीप्रमाणे तपासणी सुरू असतानाच एका कर्मचाऱ्याचे लक्ष विमानातील वॉशरुमच्या आरशाकडे गेले. त्या आरशावर लाल रंगाच्या लिपस्टिकने 'हायजॅक'चा असं लिहिलं होतं. कर्मचाऱ्याने तात्काळ याची माहिती विमानाचे मुख्य वैमानिक आणि विमानतळ सुरक्षा नियंत्रण कक्षाला दिली. त्याक्षणीच विमानाचे टेक ऑफ थांबवण्यात आलं. ते विमान आयसोलेशन बे मध्ये हलवलं आणि प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. 

हायजॅकचा मेसेज मिळताच विमानतळ प्रशासनाने 'हायजॅक प्रोटोकॉल' लागू करत तातडीने आणीबाणी घोषित करण्यात आली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, स्थानिक पोलीस, अग्निशामक दल आणि बॉम्बशोधक पथकाने विमानाला घेराव घालून तपासणी करण्यात आली. 

दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विमान, विमानातील प्रत्येक सीट, कार्गो होल्ड आणि सर्व प्रवाशांच्या बॅगांची मेटल डिटेक्टर आणि स्निफर डॉग्सच्या सहाय्याने अत्यंत कसून तपासणी केल्यानंतर काहीही सापडले नाही. 

 

STORY | Hijack threat note found in Kolkata-Mumbai Air India flight; aircraft taken to isolation bay A hijack threat note found in the washroom of a Mumbai-bound Air India flight before take-off on Wednesday morning prompted security officials to park the aircraft in an isolation bay of the airport here, an official said. The flight was scheduled to depart at 10.20 am. The note threatening that the plane would be hijacked at 11.10 am was found in the washroom just before take-off, said Vikram Singh, the director of the Netaji Subhash Chandra Bose International Airport. READ | https://t.co/KXguEpN8kR VIDEO

— Press Trust of India (@PTI_News) November 11, 2026

त्यामुळे एखाद्या प्रवाशाचा खोडसाळपणा होता की यामागे काही कट होता, याची तापसणी करण्यात येत आहे. दुसरीकडे ज्या प्रवाशांनी टेक-ऑफपूर्वी टॉयलेटचा वापर केला होता, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.  पण यामुळे या विमानाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे नाहक हाल झाले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Breaking News