आज किती रुपयांनी वाढल्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे ताजे रेट्स
LPG Gas Cylinder Price Today : देशात 14.2 किलो चा घरगुती तर 19 किलो चा व्यावसायिक अशा वजनाचे गॅस सिलेंडर वापरले जातात. तुमच्या शहरातील 18 ऑक्टोबर 2026 रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती आहेत हे खरेदी करण्यापूर्वी तपासून घ्या.
LPG Gas Cylinder Price Today : LPG गॅस सिलेंडरचा वापर हा देशातील अनेक घरांमध्ये तसेच हॉटेल, उपहारगृहांमध्ये अन्न शिजवण्यासाठी केला जातो. जर LPG गॅस सिलेंडरचे दर वाढले तर त्याचा परिणाम हा अर्थात महिन्याच्या बजेटवर होतो. देशात 14.2 किलो चा घरगुती तर 19 किलो चा व्यावसायिक अशा वजनाचे गॅस सिलेंडर वापरले जातात. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या स्थिर राहिल्या. तेव्हा 18 ऑक्टोबर 2026 रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती किती? (14.2 किलो ग्रॅम)
दिल्ली- 942 रुपये
मुंबई- 941.50 रुपये
कोलकाता- 968 रुपये
चेन्नई- 957.50 रुपये
नोएडा- 939.50 रुपये
गुरुग्राम- 950.50 रुपये
लखनऊ- 979.50 रुपये
जयपुर- 945.50 रुपये
पटना- 1,031.50 रुपये
हैदराबाद- 994 रुपये
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती किती? (19 किलो ग्रॅम)
दिल्ली- 2810 रुपये
मुंबई- 2764.50 रुपये
कोलकाता- 2954 रुपये
गुरुग्राम - 2828 रुपये
नोएडा- 2810 रुपये
लखनऊ - 2932.50 रुपये
गॅस सिलेंडरचे दर कसे ठरतात?
LPG सिलिंडरच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यांवर अवलंबून असते. तेल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. घरगुती गॅसच्या किंमतींत होणारे बदल सहसा महिन्याच्या सुरुवातीला केले जातात तर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतींतही वेळोवेळी बदल केले जातात. त्यामुळे गॅस सिलिंडर बुक करण्यापूर्वी ताज्या दरांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
युद्धामुळे ओढवलं संकट :
इराण आणि अमेरिका युद्धामुळे भारताच्या समोर LPG चं संकेत उभं राहिलं आहे. भारत आपल्या गरजेच्या जवळपास 90 टक्के LPG हे बाहेरून आयात करते. मात्र काळानुसार परिस्थिती बदलली आहे. सरकारने तेल शुद्धीकरण कंपन्यांसमोर देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एलपीजी उत्पादनासाठी कंपन्यांना अशा प्रकारचे उद्दिष्ट दिले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.