LPG Gas Cylinder Today : LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर सुद्धा होत असतो. तेव्हा सिलेंडर बुक करण्यापूर्वी घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या ताज्या किंमती जाणून घेणं महत्वाचं ठरतं. तेव्हा देशातील प्रमुख शहरात LPG घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
सोमवार 19 ऑक्टोबर 2026 रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांना ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच दरवाढीचा सामना करावा लागला होता. घरगुती सिलेंडर हा नावाप्रमाणे घरातील वापरासाठी केला जातो. ज्याचं वजन हे 14.2 किलो ग्रॅम इतकं असतं तर व्यावसायिक सिलेंडर 19 किलो ग्रॅम वजनाचा असतो तो अधिकतर हॉटेल, उपहारगृहांमध्ये वापरला जातो.
तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती :
जर तुमच्या घरातील गॅस संपणार असेल, तर ऑर्डर देण्यापूर्वी तुमच्या शहरातील सध्याचा दर तपासून घ्या. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत प्रत्येक शहरात वेगवेगळी असते. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पाटण्यातील घरगुती गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीच्या तुलनेत सुमारे 90 रुपयांनी जास्त आहे.
दिल्ली- 942 रुपये
मुंबई- 941.50 रुपये
कोलकाता- 968 रुपये
चेन्नई- 957.50 रुपये
नोएडा- 939.50 रुपये
गुरुग्राम- 950.50 रुपये
लखनऊ- 979.50 रुपये
जयपुर- 945.50 रुपये
पटना- 1,031.50 रुपये
हैदराबाद- 994 रुपये
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती :
ऑक्टोबर महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या नाहीत त्यामुळे ग्राहकांना किंमतींमधील बदलांपासून दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे 1 ऑक्टोबर रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये याची किंमत 62.50 रुपयांनी वाढून 2810 रुपयांवर पोहोचली आहे.
दिल्ली- 2,810 रुपये
मुंबई- 2,764.50 रुपये
कोलकाता- 2,954 रुपये
चेन्नई- 2,983 रुपये
बेंगलुरु- 2,898 रुपये
पटना- 3,100.50 रुपये