LPG Gas Cylinder Rates Today : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांचं लक्ष हे LPG गॅस सिलेंडरच्या किंमतींवर असतं. अधिकतर सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या या महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. भारतात सध्या दोन प्रकारचे LPG गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा समावेश असतो घरगुती गॅस सिलेंडर हा 14.2 किलोग्राम तर व्यावसायिक गॅस सिलेंडर हा 19 किलोग्राम वजनाचा असतो. मागील काही महिन्यात सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात बदल केलेले नाहीत. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र जवळपास दार महिन्याला चढउतार होत असते.
तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरचे रेट्स (14.2 किलोग्राम):
दिल्ली 939.50 रुपये
नोएडा 939.50 रुपये
मुंबई 941.50 रुपये
कोलकाता 968.00 रुपये
पटना 1,031.50 रुपये
बेंगलुरु 944.50 रुपये
भुवनेश्वर 968.00 रुपये
वाराणसी 979.50 रुपये
लखनऊ 979.50 रुपये
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरचे रेट्स (19 किलोग्राम):
दिल्ली 2,820.00 रुपये
नोएडा 2,757.50 रुपये
मुंबई 2,774.50 रुपये
कोलकाता 2,964.00 रुपये
पटना 3,110.50 रुपये
बेंगलुरु 2,774.00 रुपये
भुवनेश्वर 3,004.00 रुपये
वाराणसी 2,942.00 रुपये
लखनऊ 2,932.50 रुपये