SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांशिवाय राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या भेटीला

दिल्लीतील राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या शिवाय राष्ट्रवादींच्या नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 02, 2026, 11:18 AM IST | Updated: Nov 02, 2026, 11:45 AM IST
Image Credit: NCP leaders meet Amit Shah
Join

दिल्लीतील राजकारणातून मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादींच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार नसल्याने देशासह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अमित शाह यांना भेटण्यासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफही गेले होते. रविवारी रात्री ही भेट झाली. बंद दरवाज्यामागे नेमकं काय बोलणं झालं हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण गेल्या काही दिवसांपूर्वी अर्थ खात पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार अशा आशयाचा बातमी आली होती. त्यामुळे अमित शाहांसोबत अर्थ खात्याबाबत काही बोलणं झालं का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असून पक्षात दोन गट पडल्याची बातम्या अनेक वेळा समोर आल्या आहेत. त्यामुळे या भेटीमुळे अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. 



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज कोअर कमिटीची बैठक 

तर इकडे महाराष्ट्रात आज संध्याकाळी 5 वाजता देवगिरीवर बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअरची बैठकी होणार आहे. या बैठकीला पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर होत असलेल्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे. पक्षांतर्गत विविध विषयांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक

तरदुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. दर मंगळवारी होणारी आमदारांची नियमित बैठक गेल्या काही आठवड्यांपासून होत नसल्याने पक्षातील आमदारांमध्ये नाराजी पसरली होती.  त्यामुळे अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर उद्या ही बैठक होत असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत आगामी रणनीती आणि पक्ष संघटनेबाबत चर्चेसोबत आमदारांच्या मतदारसंघातील कामांबाबद्दल देखील चर्चा होणार आहे. 
 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES