भारत-चीन सीमेवरील माणा गाव हे भारतातील पहिले गाव म्हणून ओळखलं जातं. साधारण 4 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गावाला हे नाव दिलं होतं. माणा हे गाव यापूर्वी भारतातील शेवटचे गाव म्हणून ओखळले जात होते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी या गावाची ही ओळख पुसून भारतातील पहिले गाव अशी नवी ओळख दिली. मात्र या हंगामातील पहिली बर्फवृष्टी होताच माणा गाव ओस पडायला सुरुवात झाली आहे. यामागचे कारणदेखील एका व्लॉगरने सांगितले आहे.
भारतातील पहिले गाव माणा जे उत्तराखंडच्या चमोली येथे आहे. येथे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि भयंकर गारवा असतो. नोव्हेंबर महिन्यातच रस्ते, डोंगर इतकंच नव्हे तर घरांच्या छप्परांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचलेला असतो. तापमानाचा पारा उणे अंशापर्यंत जातो. ज्यामुळं पिण्याचे पाणी आणि रोजच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. बद्रीनाथ धाम बंद झाल्यानंतर लोक गावं खाली करण्यास सुरुवात करतात.
जोपर्यंत बद्रीनाथ धाम सुरू असते तोपर्यंत गावकरी तिथे दुकाने थाटून आणि व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यामुळे, हिवाळ्यात बद्रीनाथ धाम बंद झाल्यावर लोकांना तिथे थांबण्याचे काही कारणच उरत नाही. 'चमोली'चे युट्युब क्रिएटर सचिन नेगी यांनीही त्यांच्या व्हिडिओमध्ये हेच म्हटले आहे, "भारताचे पहिले गाव, माना, आता रिकामे होऊ लागले आहे." या व्हिडिओला आतापर्यंत 56 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
माणा गाव हे प्रसिद्ध बद्रीनाथ धामपासून 3 किमीपासून लांब अलकनंदा आणि सरस्वती नदीच्या तीरावर वसले आहे. या गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व लाभले आहे. हिवाळ्यात या गावात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. त्यामुळं या गावातील लोक खाली असलेल्या गावात राहण्यासाठी जातात. सहा महिन्यांसाठी गावकरी येथे राहतात. जेव्हा बद्रीनाथचे दरवाजे पुन्हा सुरू होतात तेव्हा पुन्हा गावकरी येथे येतात.
माणागावात महर्षि वेद व्यास यांची गुहा आहे. येथे बसून त्यांनी महाभारताची रचना केली होती. व गणपती बाप्पाने महाभारत लिहिले होते. तसंच, सरस्वती नदी याच गावातून उगम पावते, असंही म्हटलं जातं. सरस्वती नदीच्या वेगामुळे द्रौपदीला पलीकडे जाणे कठीण जात होते, तेव्हा महाबली भिमने एक भलामोठा दगड नदीवर ठेवला, ज्याला आज 'भीम पूल' म्हणून ओळखले जाते। हा एक नैसर्गिक शिळेचा पूल आहे.
माणा गावातूनच पवित्र 'सरस्वती नदी' वाहते। आख्यायिकेनुसार, वेद व्यास महाभारत लिहीत असताना सरस्वती नदीच्या आवाजाने वाचनात अडथळा येत होता, तेव्हा व्यासांच्या विनंतीवरून नदीने येथे शांतपणे वाहण्यास सुरुवात केली आणि पुढे गुप्त झाली.