भारताने पाकिस्तानचा एक गडी राखून पराभव करत 'अंडर-19 आशिया कप 2026'चे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी अल अमरात क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात, भारतासमोर 338 धावांचा डोंगर होता. एका क्षणी भारत सहजपणे या सामन्यात पराभूत होणार असं वाटत असतानाच अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना भारताने सहज जिंकला. मोहित उलवाने अहमद हुसेनच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. यानंतर संपूर्ण भारतातून क्रिकेट चाहते व्यक्त होत असून, जल्लोष करत आहेत.
पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयानंतर, 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या प्रतिक्रिया दिली आहे. मेरठमधील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी भारतीय खेळाडूंचं अभिननंदन केलं आणि संघाच्या निमित्ताने पाकिस्तानलाच टोला लगावला.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. आमच्या मुलांनी त्यांना अंडर-19 आशिया कपमध्ये त्यांना हरवले आहे. त्यांचे अभिनंदन! जर तुम्ही आमच्या मुलांनाही हरवू शकत नसाल, तर मग मोठ्यांचं काय? छे, छे!" त्यांच्या या विधानावर रॅलीत उपस्थित असलेल्या गर्दीने टाळ्या वाजवून दाद दिली. या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होता आहे. रॅलीदरम्यान, ओवेसी यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि समाजवादी पक्षावरही जोरदार टीका केली.
"मला रात्रभर फोन येत होते, कोणी संघातून, कोणी लाल टोपीवाले...तू देशाचा दुष्मन आहेस वैगेरे म्हणायचे. आपल्या शेजारी देशातूनही फोन आले. मी या सर्वांचा इतका आवडता आहे हे मला माहिती नव्हतं. शेजारी देशातून फोन करुन म्हणतात की, तू ऑपरेशन सिंदूरवर बोललास तुला सोडणार नाही. मी म्हणालो, मी येथे बसलोय, तू फक्त फोनवरुन बोलतोस काही करत नाही. तर म्हणतात, तुला सोडणार नाही. मी म्हणालो, मी पण सोडणार नाही, तू फक्त समोर ये," असं ओवेसी म्हणाले.
tum hamare bachcho'n se nahi jeet sakte, to humse kya muqabla karoge? U19 Asia Cup ke Final mein Pakistan ko hara kar trophy jeetne par Barrister @asadowaisi ne Team India ko mubarakbad di. https://t.co/qzvNYkLfDt
— AIMIM (@aimim_national) November 15, 2026
पुढे त्यांनी म्हटलं की, "भारताने आज पाकिस्तान हरवलं. आपल्या मुलांनी त्यांचा पराभव केला, त्याचं अभिनंदन, तुम्ही मुलांना हरवू शकत नाही, आणि मग मोठ्याचं काय? राहू दे. आमच्या पोराने चौकार मारला.".
अंतिम सामन्यात विजयाचे लक्ष्य गाठताना भारतीय संघ कठीण परिस्थितीत सापडला होता, कारण 252 धावांत भारताचे आठ गडी बाद झाले होते. अशा स्थितीत, मनाल चौहान आणि मोहित उल्वा यांनी नवव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करून भारताला पुन्हा सामन्यात परत आणले. मनालने 47 धावा केल्या, तर मोहित 49 धावांवर नाबाद राहिला.
भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. मोहित उल्वाने चौकार मारून विजय निश्चित केला आणि भारताला नवव्यांदा 'अंडर-19 आशिया कप'चे विजेतेपद मिळवून दिले.