SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'तुम्ही आमच्या मुलांनाही...', भारताने अंडर-19 आशिया कप जिंकल्यानंतर असदुद्दीन ओवैसींचं विधान, 'पाकिस्तानमधून मला...'

एमआयएमचे प्रमुख आणि खासदर असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय संघाच्या विजयावर भाष्य करताना पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 15, 2026, 03:09 PM IST | Updated: Nov 15, 2026, 03:16 PM IST
Image Credit: भारताने अंडर-19 आशिया कप जिंकल्यानंतर असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानला टोला
Join

भारताने पाकिस्तानचा एक गडी राखून पराभव करत 'अंडर-19 आशिया कप 2026'चे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी अल अमरात क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात, भारतासमोर 338 धावांचा डोंगर होता. एका क्षणी भारत सहजपणे या सामन्यात पराभूत होणार असं वाटत असतानाच अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना भारताने सहज जिंकला. मोहित उलवाने अहमद हुसेनच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. यानंतर संपूर्ण भारतातून क्रिकेट चाहते व्यक्त होत असून, जल्लोष करत आहेत.

पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयानंतर, 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या प्रतिक्रिया दिली आहे. मेरठमधील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी भारतीय खेळाडूंचं अभिननंदन केलं आणि संघाच्या निमित्ताने पाकिस्तानलाच टोला लगावला.

हे ही वाचा - U19 Asia Final: पाकिस्तानविरोधातील विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मर्यादा ओलांडली? BCCI ने घेतली स्पष्ट भूमिका, 'जर तुम्ही इतक्या....'

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. आमच्या मुलांनी त्यांना अंडर-19 आशिया कपमध्ये त्यांना हरवले आहे. त्यांचे अभिनंदन! जर तुम्ही आमच्या मुलांनाही हरवू शकत नसाल, तर मग मोठ्यांचं काय? छे, छे!" त्यांच्या या विधानावर रॅलीत उपस्थित असलेल्या गर्दीने टाळ्या वाजवून दाद दिली. या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होता आहे. रॅलीदरम्यान, ओवेसी यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि समाजवादी पक्षावरही जोरदार टीका केली.

ओवेसी नेमकं काय म्हणाले?

"मला रात्रभर फोन येत होते, कोणी संघातून, कोणी लाल टोपीवाले...तू देशाचा दुष्मन आहेस वैगेरे म्हणायचे. आपल्या शेजारी देशातूनही फोन आले. मी या सर्वांचा इतका आवडता आहे हे मला माहिती नव्हतं. शेजारी देशातून फोन करुन म्हणतात की, तू ऑपरेशन सिंदूरवर बोललास तुला सोडणार नाही. मी म्हणालो, मी येथे बसलोय, तू फक्त फोनवरुन बोलतोस काही करत नाही. तर म्हणतात, तुला सोडणार नाही. मी म्हणालो, मी पण सोडणार नाही, तू फक्त समोर ये," असं ओवेसी म्हणाले.

 

 

पुढे त्यांनी म्हटलं की, "भारताने आज पाकिस्तान हरवलं. आपल्या मुलांनी त्यांचा पराभव केला, त्याचं अभिनंदन, तुम्ही मुलांना हरवू शकत नाही, आणि मग मोठ्याचं काय? राहू दे. आमच्या पोराने चौकार मारला.".

अंतिम सामन्यात विजयाचे लक्ष्य गाठताना भारतीय संघ कठीण परिस्थितीत सापडला होता, कारण 252 धावांत भारताचे आठ गडी बाद झाले होते. अशा स्थितीत, मनाल चौहान आणि मोहित उल्वा यांनी नवव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करून भारताला पुन्हा सामन्यात परत आणले. मनालने 47 धावा केल्या, तर मोहित 49 धावांवर नाबाद राहिला.

भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. मोहित उल्वाने चौकार मारून विजय निश्चित केला आणि भारताला नवव्यांदा 'अंडर-19 आशिया कप'चे विजेतेपद मिळवून दिले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES