Goa Palolem Beach Global Beach Index 2026 : गोवा हे फक्त भारतच नाही तर जगभरातील पर्यटकांचे ड्रीन डेस्टिनेशन आहे. येथील स्वच्छ, सुंदर अथांग समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतात. गोव्यातील पाळोळे समुद्रकिनारा आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा ठरला आहे. या समुद्र किनाऱ्याने जागतिक निर्देशांकात सहावे स्थान पटकावले आहे.
दक्षिण गोव्यातील निसर्गरम्य पाळोळे समुद्रकिनाऱ्याला आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून बहुमान मिळाला आहे. ''बीच डॉट कॉम''च्या 2026 च्या जागतिक निर्देशांकात जगातील सर्वोत्तम 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये पाळोळेने 6 वे स्थान पटकावले आहे. या यादीत स्थान मिळवणारा हा आशियातील एकमेव समुद्रकिनारा ठरला आहे. 18 प्रमाणित निकषांच्या आधारे झालेल्या या निवडीमुळे गोव्याच्या पर्यटन वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पाळोळे बीच हा कानाकोण तालुक्यात आहे. अर्धचंद्राकृती खाडी, पांढरी वाळू, नारळाची झाडे आणि स्वच्छ पाण्यासाठी हा समुद्र किनारा ओळखला जातो. हा समुद्र किनारा गर्दीपासून अलिप्त आहे.
'बीच.कॉम'च्या 'ग्लोबल बीच इंडेक्स 2026' मध्ये या समुद्र किनाऱ्याने सहावे स्थान पटकावले. तज्ज्ञांच्या शिफारसी, पर्यटकांचे अभिप्राय, समुद्राच्या पाण्याचा रंग आणि स्वच्छतेबाबत अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'कडून मिळालेली माहिती यांसारख्या 18 निर्धारित मापदंडांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यांचे मूल्यांकन करण्यात आले.
पाळोळे समुद्रकिनाऱ्याला जगातील सर्वात समुद्र किनाऱ्यांच्या यादीत टॉप 10 मध्ये स्थान मिळाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनात गोव्याचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. दक्षिण गोव्याला जागाच्या नकाशावर विशेष नाव मिळाले आहे. या समुद्र किनाऱ्यावर कयाकिंग, डॉल्फिन सफारी यासह अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी देखील पर्यटक मोठ्या संख्यने येथे येतात.