• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /लाईट बंद करणं, महिलेच्या अंगावर झोपणं अन् तोंड दाबणं हा बलात्काराचा प्रयत्न नाही; पाटणा हायकोर्टाकडून आरोपीची सुटका

लाईट बंद करणं, महिलेच्या अंगावर झोपणं अन् तोंड दाबणं हा बलात्काराचा प्रयत्न नाही; पाटणा हायकोर्टाकडून आरोपीची सुटका

हा निर्णय उच्च न्यायालयाच्या आणखी एका वादग्रस्त निकालानंतर आला आहे, ज्यामध्ये एखाद्या महिलेचे स्तन दाबणे किंवा तिची सलवारची नाडी सोडणे, हे बलात्काराचा प्रयत्न ठरत नाही.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 15, 2026, 09:04 PM IST|Updated: Oct 15, 2026, 09:09 PM IST
joinshare
लाईट बंद करणं, महिलेच्या अंगावर झोपणं अन् तोंड दाबणं हा बलात्काराचा प्रयत्न नाही; पाटणा हायकोर्टाकडून आरोपीची सुटका
Image Credit: महिलेच्या अंगावर झोपणं अन् तोंड दाबणं हा बलात्काराचा प्रयत्न नाही - पाटणा हायकोर्ट

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेच्या घरात शिरणे, तेलाचा दिवा विझवणे, तिच्या अंगावर पडणे आणि तिचे ओरडणे थांबवण्यासाठी तिचे तोंड दाबून धरणे, हे कृत्य बलात्काराचा प्रयत्न या व्याख्येत बसत नाही असा निकाल पाटणा उच्च न्यायालयाने दिली आहे. न्यायमूर्ती संदीप कुमार यांनी स्पष्ट केले की, शरीरसंबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने कोणतीही प्रत्यक्ष कृती  केलेली नसल्यामुळे, अशा प्रकारची कृत्ये भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 376/511(बलात्कार/बलात्काराचा प्रयत्न) अंतर्गत येत नाहीत. यामुळे उच्च न्यायालयाने आरोपी मोहम्मद ऐनुल हक याला सुनावलेली चार वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा रद्द केली. त्याऐवजी, त्याने आधीच कोठडीत घालवलेला सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी हीच त्याची मुख्य शिक्षा असल्याचे न्यायालयाने म्हटले.

दरम्यान, न्यायालयाने त्याला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354 (विनयभंग) अंतर्गत दोषी ठरवले आणि 25 हजारांचा दंड ठोठावला. तसेच, ही संपूर्ण रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. हा निकाल अशा वेळी आला आहे, जेव्हा या वर्षाच्या सुरुवातीला पाटणा उच्च न्यायालयाच्या एका वादग्रस्त निर्णयावर मोठी चर्चा झाली होती. त्या प्रकरणात न्यायालयाने महिलेच्या स्तनांना स्पर्श करणे किंवा तिच्या सलवारची नाडी सोडणे, हे बलात्काराचा प्रयत्न ठरत नाही असे निरीक्षण नोंदवले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहूनदखल घेतल्यानंतर, त्या निर्णयावर तीव्र टीका झाली होती.

सध्याचे प्रकरण फेब्रुवारी 2010 मधील असून ते बेगुसराय जिल्ह्यातील आहे. पीडित महिला विधवा असून मजुरी करुन पोट भरते. ती आपल्या मुलांसोबत राहते. पीडितेच्या म्हणण्यानुसार, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी तिच्या झोपडीत शिरला, त्याने तेथील तेलाचा दिवा विझवला, तो तिच्या अंगावर झोपला आणि तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबले.
तिचा आरडाओरडा ऐकल्यानंतर आजूबाजूचे गावकरी घटनास्थळी धावून आले. त्यांनी हकला पकडले आणि मारहाण केली. स्थानिक पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यानंतर, पीडितेने मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. जुलै 2013 मध्ये, एका अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी हकला भारतीय दंड संहितेच्या कलम 376/511 आणि 448 (घरात घुसणे) अंतर्गत दोषी ठरवले.

 

Turning off light, lying on woman and pressing her mouth not attempt to rape: Patna High Court Read here: https://t.co/qh8bYEHFTT https://t.co/otHmy2FAj2

— Bar and Bench (@barandbench) October 15, 2026

 

या निकालाला आव्हान देताना, हकने असा युक्तिवाद केला की, फिर्यादी पक्ष केवळ पीडितेने केलेल्या दाव्यावर अवलंबून होता. महिलेची कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली नसल्याचाही युक्तिवाद त्याने केला. तपास अधिकाऱ्याची कधीही तपासणी केली गेली नाही आणि त्या महिलेला कोणतीही शारीरिक इजा झाली नव्हती किंवा तिचे कपडे फाटले नव्हते असेही दावे त्याने केले.

हकने घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि बळाचा वापर केला हे उच्च न्यायालयाने मान्य केले असले तरी, बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप कायदेशीररित्या टिकू शकत नाही, असे मत न्यायालयाने मांडले. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा आधार घेत, न्यायमूर्ती कुमार यांनी निरीक्षण नोंदवले की, बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवण्यासाठी, केवळ तयारीच्या टप्प्याच्या पुढे जाऊन, सर्व प्रतिकाराला न जुमानता लैंगिक संबंध ठेवल्यचा स्पष्ट पुरावा आवश्यक असतो.

"अपीलकर्त्याने स्वतःचे किंवा पीडितेचे कपडे काढले किंवा लैंगिक संबंधाच्या दिशेने कोणतेही कृत्य केले याचा कोणताही पुरावा नाही. तो तयारीच्या टप्प्याच्या पुढे गेला होता आणि त्याने असे कृत्य केले होते की, जर त्यात व्यत्यय आणला नसता तर बलात्कार झाला असता, असे मानले जाऊ शकत नाही," असे उच्च न्यायालयाने म्हटले.

"अश्लील स्वरूपाच्या कृत्यांचे रूपांतर अनेकदा बलात्काराच्या प्रयत्नांत केल्यासारखे भासवले जाते," असे निरीक्षण नोंदवत, न्यायालयाने असे ठरवले की हक याचे कृत्य भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354 अंतर्गत येते. न्यायालयाने मूळ निकालात बदल केला, मात्र घरफोडी केल्याप्रकरणी कलम 448 IPC अंतर्गत असलेली त्यांची शिक्षा कायम ठेवली.

घटनेला 16 वर्षांचा कालावधी उलटला असून, हक 13 वर्षांहून अधिक काळापासून जामिनावर असताना त्यांच्या वर्तनाबाबत कोणतीही तक्रार किंवा प्रतिकूल अहवाल नसणे, या गोष्टी लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द केली. तसेच इतके दिवस भोगलेली कारावासाची शिक्षा हीच शिक्षा ठरवली आणि आठ आठवड्यांच्या आत 25 हजारांची नुकसानभरपाई जमा करण्याचा आदेश दिला.

अपीलकर्त्याच्या वतीने वकील पारितोष परिमल आणि मोहम्मद फहीमुद्दीन यांनी बाजू मांडली.राज्याच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अनिता कुमारी सिंग यांनी प्रतिनिधित्व केले.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
High court