पेट्रोल 3 रुपयांनी स्वस्त झालं, 'या' ठिकाणी सरकारने कमी केले दर, पाहा तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल - डिझेलच्या किंमती
Petrol And Diesel Rates : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणाऱ्या बदलांचा हा पेट्रोल आणि डिझेल यांच्यात किंमतींवर होत असतो. 20 नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
Petrol And Diesel Rates Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये चढ उतार झाल्यास त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर होत असतो. इंधनाचे दर वाढले तर अनेक वस्तूंच्या किंमती सुद्धा महाग होतात. भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत, त्यात कोणताही बदल झालेला नाही. मात्र भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानच्या सरकारने मात्र एक मोठा निर्णय घेऊन तेथील सामान्य नागरिकांना दिलासा दिलाय. पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशातील 1 लिटर पेट्रोलच्या किंमती कमी केल्या असून आता तेथील पेट्रोलची प्रति लिटर किंमत ही 325 रुपये आहे. तर दुसरीकडे शहबाज शरीफ सरकारने डिझेलचे भाव मात्र तसेच ठेवलेत. पेट्रोलच्या नव्या किंमती या पाकिस्तानात 18 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आलेल्या आहेत.
किती आहे पाकिस्तानातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव?
डॉनच्या रिपोर्टनुसार ऑयल एंड गॅस रेग्युलेटरी अथॉरिटीकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून यात सांगण्यात आलंय की या महिन्यातील पेट्रोलच्या किंमतीमध्ये घट होण्याची ही 11 वी वेळ आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत कमी होऊन 325 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर झाली आहे. तर हाय स्पीड डिझेलची किंमत 358 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर इतकी आहे.
भारतात पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती?
सकाळी 6 वाजता दररोज सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करत असतात. त्याप्रमाणे आज 20 नोव्हेंबर रोजी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमती सकाळी जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधन दरांच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
तुमच्या शहरातील पेट्रोलच्या प्रतिलिटर किंमती (रुपये) :
दिल्ली ₹102.12
मुंबई ₹111.21
कोलकाता ₹113.51
चेन्नई ₹107.76
बंगळुरू ₹111.68
हैदराबाद ₹116.15
गुरुग्राम ₹102.97
लखनऊ ₹101.89
पटना ₹113.35
जयपुर ₹113.19
नोएडा ₹101.96
अहमदाबाद ₹102.15
तुमच्या शहरातील डिझेलच्या प्रतिलिटर किंमती (रुपये) :
दिल्ली ₹95.20
मुंबई ₹97.83
कोलकाता ₹99.82
चेन्नई ₹99.55
बंगळुरू ₹99.56
हैदराबाद ₹104.23
गुरुग्राम ₹95.64
लखनऊ ₹95.36
पटना ₹99.36
जयपुर ₹98.25
नोएडा ₹95.44
अहमदाबाद ₹98.27