तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या आजचे इंधन दर
Petrol Diesel Rates Today 21 November 2026 : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत झालेल्या चढ उतारांचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर होतं असतो. तसेच इंधन दर वाढले की अनेक वस्तूंच्या किंमती वाढीला वधारतात. तेव्हा शनिवारी 21 नोव्हेंबर 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमतीं किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
Petrol Diesel Rates Today : अमेरिका आणि ईराण युद्धाच्या कारणामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' बंद झालं आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र भारतात त्यामानाने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या स्थिर आहेत. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याचे श्रेय केंद्र सरकारच्या धोरणाला दिले, ज्यामध्ये उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करणे आणि देशांतर्गत इंधनाचा पुरवठा अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करणे यांचा समावेश होता. सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे आजचे ताजे दर जाहीर केले. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे रेट्स काय आहेत याविषयी जाणून घेऊयात.
अलीकडील कपातीनुसार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रति बॅरल 92 डॉलर्सच्या आसपास आहेत. नुकत्याच केलेल्या कपातीनुसार, पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रति बॅरल 92 डॉलर्सच्या आसपास आहेत, तर संकट सुरू होण्यापूर्वी त्या प्रति बॅरल सुमारे 67 ते 68 डॉलर्स इतक्या होत्या.
पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत. पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.