SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप... डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करणार दोन खासदार? भाजपाच्या संपर्कात?

मागील काही दिवसांपासून देशातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच काँग्रेसच्या गोटातून मोठी माहिती समोर येतेय.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 29, 2026, 11:33 IST | Updated: Nov 29, 2026, 11:40 IST
Image Credit: political news two Congress MPs likely to vote in favor of delimitation source
Join

डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळं देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार आहेत. डिलिमिटेशन  विधेयक मांडण्याआधी लोकसभेतील आसन व्यवस्थेत मोठी आदलाबदल पहायला मिळतेय. तर, भाजपकडूम डिलिमिटेशनसाठी मतांची जुळवाजुळव सुरू असून विरोधकांशीदेखील संपर्क सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्यानंतर काँग्रेससह राजदचेही काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

डिलिमिटेशनसाठी भाजपकडून आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2026 दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेत सुधारित डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक मांडले जाण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची म्हणजे 360 खासदारांच्या मतांची आवश्यकता  आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हालचाली सुरू आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर, द्रमुक व अन्य पक्षांनीही विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची तयारी दर्शवली आहे. तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने या विधेयकाला कडाडून विरोध केला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे दोन खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. तर, राष्ट्रीय जमता दलाचे, हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे आणि आपचे प्रत्येकी 3 खासदार भाजपच्या संपर्कात असून डिलिमिटेशन विधेयकावर सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, हे खासदार डिलिमिटेशन

भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून हे मिशन सुरू होतं. तर, स्वतः अमित शहांकडून या मिशनचे नेतृत्व केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. सरकारला 360 चा आकडा बहुमतासाठी गाठायचा आहे तो आम्ही सहजतेने गाठू असा दावा सातत्याने सरकारमधील नेत्यांकडून व मंत्र्यांकडून केला जातोय. या दाव्याचा आधार म्हणजेच विरोधी पक्षातील हे खासदार आहेत. हे खासदार थेट संपर्कात असून डिलिमिटेशन विधेयक पारित करण्यासाठी सरकारला मदत करतील, असा दावा करण्यात येत आहे.

काँग्रेसकडून मोर्चेबांधणी

डिलिमिटेशनविरोधात इंडिया आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असून शरद पवार,एम के स्टॅलिन यांच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत.  मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधींसह इंडिया आघाडीचे नेते पवार, एम के स्टॅलिन यांची आज भेट घेणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES