• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /पंतप्रधान मोदींकडून नेपाळला 24 हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा! नेपाळचे PM बालेंद्र शाहांसोबत केले 8 करार, 5 प्रमुख घोषणा

पंतप्रधान मोदींकडून नेपाळला 24 हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा! नेपाळचे PM बालेंद्र शाहांसोबत केले 8 करार, 5 प्रमुख घोषणा

नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी कठीण काळात आणि आपत्तीनंतर भारताने दिलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहेत, तसेच दोन्ही शेजारी देशांमधील एकता, परस्पर विश्वास आणि सहकार्याच्या भावनेवर भर दिला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 23, 2026, 15:07 IST|Updated: Nov 23, 2026, 15:13 IST
joinshare
पंतप्रधान मोदींकडून नेपाळला 24 हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा! नेपाळचे PM बालेंद्र शाहांसोबत केले 8 करार, 5 प्रमुख घोषणा
Image Credit: पंतप्रधान मोदींकडून नेपाळला 24 हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा!

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पंतप्रधान मोदींकडून नेपाळला 24 हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा! नेपाळचे PM बालेंद्र शाहांसोबत केले 8 करार, 5 प्रमुख घोषणा

पंतप्रधान मोदींकडून नेपाळला 24 हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा! नेपाळचे PM बालेंद्र शाहांसोबत केले 8 करार, 5 प्रमुख घोषणा

2

24 नोव्हेंबरला शाळा-कॉलेजांना सुट्टी; मुंबईसह 'या' शहरांतील बँकाही राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी

3

मॅच ड्रॉ झाल्यावर कर्णधार शुभमन गिलने ICC कडे केली मोठी मागणी, कूकाबुरा बॉलवर उपस्थित केला प्रश्न

4

'धर्माच्या नावाखाली...' हिजाबसंदर्भात शबाना आझमींनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वादाला फुटलं तोंड

5

'मम्मी खाऊ दे.., पप्पा मला घरी न्या', लेक विनंती करत होती पण आई-वडील...; चिमुकलीचा मृत्यू, नेमकं काय झालं?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्यात नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नेपाळमधील पूरग्रस्त भागांना आधार देत पुन्हा 24,000 कोटी नेपाळी रुपये (सुमारे 15,000 कोटी भारतीय रुपये) इतक्या आर्थिक मदतीची घोषणा केली. यामुळे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या देशाला पूरस्थितीनंतर सावरण्याच्या प्रयत्नांत मोठी मदत मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी 35 वर्षीय शाह यांच्या देशाच्या विकासाबाबतच्या दृष्टिकोनाचेही कौतुक केले. ते म्हणाले की, यावर्षी नेपाळच्या जनतेने त्यांना दिलेला ऐतिहासिक जनादेश हा तिथल्या नवीन पिढीच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे.

द्विपक्षीय बैठकीनंतर संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, "नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच द्विपक्षीय भेटीसाठी भारतात आगमन केले आहे, त्यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वी, जगातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना त्यांच्या दूरदृष्टीची आणि विचारांची स्पष्ट झलक पाहायला मिळाली होती. गेल्या काही तासांत झालेल्या चर्चेदरम्यान, मला नेपाळच्या भविष्याबद्दल आणि भारत-नेपाळ संबंधांच्या बळकटीकरणाबाबत त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन व कटिबद्धता दिसून आली."

पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की, भारत आणि नेपाळ केवळ शेजारी देश नाहीत, तर हे दोन्ही राष्ट्र विश्वास आणि मैत्रीच्या खोलवर रुजलेल्या बंधनांनी एकमेकांशी जोडलेले आहेत. ते म्हणाले, "आमच्या आकांक्षा आणि आव्हाने समान आहेत आणि कठीण प्रसंगात आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. नेपाळमधील पुरामुळे ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्याबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो."

"नेपाळच्या पुनर्बांधणी आणि विकासाला पाठिंबा देण्यासाठी, आम्ही 24,000 कोटी नेपाळी रुपयांचे विकास सहकार्य पॅकेज जाहीर करत आहोत," असे त्यांनी जाहीर केले. 26 ऑगस्ट रोजी आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे 1500 लोकांचा मृत्यू झाला, तर 5200 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

भारत आणि नेपाळदरम्यान 8 महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले

फॉरेन्सिक विज्ञान आणि संशोधन: भारतातील गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आणि नेपाळ पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागादरम्यान शैक्षणिक व संशोधन सहकार्याचा करार

पोलीस प्रशिक्षण: भारतातील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ आणि नेपाळच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीदरम्यान सहकार्य करार.

प्रशासकीय प्रशिक्षण: नेपाळमधील  सरकारी कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत भारत आणि नेपाळमधील करार.

आयुर्वेद आणि पारंपरिक वैद्यक: आयुर्वेद तसेच इतर पारंपरिक उपचार पद्धतींच्या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत करार

उपग्रह संपर्क व्यवस्था: दक्षिण आशिया उपग्रहाच्या वापरासाठी उपग्रह संचार (SATCOM) नेटवर्क स्थापन करण्याबाबत इस्रो आणि नेपाळच्या माहिती व संचार मंत्रालयादरम्यान करार

शाश्वत शहरी विकास: शाश्वत शहरी विकासाच्या क्षेत्रात तांत्रिक सहकार्य करण्याबाबत करार

आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र: आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांच्या आरोग्य मंत्रालयांदरम्यान करार

पशुधन आणि मत्स्यव्यवसाय विकास: पशुधन आणि मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत भारत आणि नेपाळमध्ये करार

या आठ सामंजस्य करारांमुळे भारत आणि नेपाळमधील शैक्षणिक, पोलीस, प्रशासकीय, आरोग्य, तंत्रज्ञान आणि कृषीपूरक क्षेत्रांतील सहकार्याला चालना मिळणार आहे

5 प्रमुख घोषणा आणि महत्त्वाचे करार

1) नेपाळसाठी 1.6 अब्ज डॉलर्सचे आर्थिक सहाय्य पॅकेज: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळसाठी अंदाजे 1.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 24 हजार कोटी नेपाळी रुपये) च्या आर्थिक सहाय्य पॅकेजची घोषणा केली. नेपाळने 2 अब्ज डॉलर्सच्या मदतीची मागणी केली होती.

2) भारत-नेपाळ संयुक्त व्हिजन डॉक्युमेंट: दोन्ही देशांमधील सहकार्याला नवी दिशा देण्यासाठी एक संयुक्त व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले जाईल.

3) 6 प्रमुख प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन: भारत आणि नेपाळमधील कनेक्टिव्हिटी, विकास आणि पायाभूत सुविधांशी संबंधित 6 प्रमुख योजना आणि प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होईल.

4) अयोध्या-जनकपूर रेल्वे सेवेचा शुभारंभ: धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी अयोध्या आणि जनकपूर दरम्यान रेल्वे सेवा सुरू केली जाईल.

5) विविध क्षेत्रांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षरी: ऊर्जा, व्यापार, कनेक्टिव्हिटी, विकास आणि इतर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि नेपाळ यांच्यात अनेक महत्त्वाचे करार केले जातील.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
PM Narendra Modi