पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सध्या चर्चेत आहेत. आम आदमी पार्टीच्या दाव्यामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आम आदमी पार्टीने दावा केला आहे की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या फ्रान्स दौरा संपल्यानंतर ते दिल्ली विमानतळावर परतल्यानंतर त्यांना तीन तास ताब्यात ठेवण्यात आले. एवढंच नाहीतर त्यांना 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. या घटनेनंतर 'आप'चे नेते सौरभ भारद्वाज आणि बलतेज पन्नू यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
सौरभ भारद्वाज यांनी या घटनेबद्दल 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलंय की, मुख्यमंत्री मान यांना विमानतळावर जवळपास तीन तास ताब्यात घेण्यात आलं होतं. पंजाबचे मुख्यमंत्री आपल्या राज्याची उत्पादने सादर करण्यासाठी पॅरिसला गेले होते. केंद्र सरकारने NOC देण्यास नकार देऊनही त्यांनी हे केलं आहे. याप्रकरणात केंद्र सरकारचा हा अहंकार आता संपला पाहिजे.
VIDEO | AAP Delhi president Saurabh Bharadwaj on Punjab CM Bhagwant Mann reportedly being 'detained for three hours' at Delhi airport, says, "The central government is now openly showing step-motherly attitude. BJP CMs go on foreign visits frequently. PM Modi visits foreign nations thrice a month... The government stops an elected CM who wants to visit Paris to promote agriculture products of his state. The central government bows to orders of the High Court. He was humiliated at the Delhi airport, harassed for three hours. Even a fine of Rs 50,000 was slapped on him. The entire world is watching how the Centre is treating the CMs of our own country." #AAP #BhagwantMann #SaurabhBharadwaj (Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTfmBd )
— Press Trust of India (@PTI_News) October 21, 2026
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबचे मुख्यमंत्री मान आणि त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांवर 50 हजारांचे सीमा शुल्क आकारण्यात आलंय. दिल्ली विमानतळावर मान आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सामानाची तपासणी केली गेली. या तपासणीत असं आढळून आलं की, त्यांनी काही वस्तू घोषित न केल्यामुळे त्यांच्याकडून शुल्क घेण्यात आलं.
Patiala, Punjab: Aam Aadmi Party General Secretary and Media In-charge Baltej Singh Pannu says, "Chief Minister Bhagwant Mann has sought permission at least four to five times to visit different countries. He wants to attract investment and industries to Punjab from abroad, but he was not allowed to travel. The world's second-largest food festival was recently held in Paris, and the Chief Minister wanted to visit it to promote Punjab's products, but he was not granted permission..."
— IANS (@ians_india) October 21, 2026
परदेशातून देशात परतल्यावर विमानतळावर काही नियम आहे. या नियमानुसार परदेशातून वस्तू खरेदी केली असेल आणि नसेल अशा प्रवाशांसाठी दोन वेगवेगळे बाहेर जाण्याचे मार्ग असतात. जर तुम्ही परदेशातून कुठल्याही सामानाची खरेदी केली नसेल तर तुम्ही विमानतळावरून हिरव्या गेटमधून बाहेर पडू शकता. पण जर तुम्ही परदेशातून वस्तू खरेदी करुन आले असाल तर तुम्हाला लाल गेटवरून बाहेर पडावं लागतं. शिवाय परदेशातून आणलेल्या वस्तूची घोषित करणेही बंधनकारक असतं. जर तुम्ही त्या वस्तूंची घोषणा केली नसेल तर त्याला शुल्क भरावा लागतो. या नियमानुसार भगवंत मान आणि त्यांचे कर्मचारी यांनी परदेशातून सामन आणलं होतं. शिवाय ते विमानतळावरून ग्रीन गेटवरून बाहेर पडत होते. म्हणून त्यांच्यावर ही कारवाई झालं असं सांगण्यात येत आहे.