SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'शरद पवारांच्या NCP सह...', राहुल गांधींचं मोठं विधान; 'आम्ही जीवापाड प्रयत्न करु, पण...'

काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांनी सांगितलं की, सर्व खासदारांनी हे स्पष्ट केले पाहिजे की भाजप स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांच्या पुनर्रचनेची (डिलिमिटेशन) प्रक्रिया राबवू इच्छित आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 27, 2026, 19:42 IST | Updated: Nov 27, 2026, 19:53 IST
Image Credit: डिलिमिटेशन विधेयकासंदर्भात राहुल गांधींचं मोठं विधान
Join

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपला पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी पक्षाच्या सर्व खासदारांना सूचना दिली आहे की, त्यांनी जनतेसमोर आणि संसदेतही या गोष्टीवर भर द्यावा की, भाजप स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ही पुनर्रचना करू इच्छित आहे. या मुद्द्यावर द्रमुक (DMK) पक्षाने त्यांच्यासोबत उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. 30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असल्याने, 'महिला आरक्षण विधेयक' आणि 'डीलिमिटेशन' विधेयकावरून राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत.

"आम्ही गेल्या वेळेस जसे प्रयत्न केले होते, तसेच हे विधेयक हाणून पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करू. प्रत्येक विरोधी पक्षाला सोबत घेण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. मात्र बऱ्याच गोष्टी पक्षांच्या भूमिकेवरही अवलंबून आहेत. बऱ्याच गोष्टी द्रमुक आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह इतर काही जणांवर अवलंबून आहेत," असं राहुल गांधांनी म्हटलं असल्याची सूत्रांची माहिती आहे.

डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी विधेयकाबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. संसदेत या विधेयकाला पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशा चर्चा सुरू असतानाच, स्टॅलिन यांनी ठामपणे सांगितले आहे की, तामिळनाडूच्या हितांशी संबंधित बाबींवर डीएमके कधीही तडजोड करणार नाही. त्यांनी यासोबतच दोन अटीही मांडल्या आहेत. 'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, "भारतातील डिलिमिटेशनमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविरुद्ध आवाज उठवणारा डीएमके हा पहिला पक्ष होता. चेन्नईमध्येच देशातील विविध राजकीय नेते पहिल्यांदा एकत्र आले होते आणि त्यांनी न्याय्य सीमांकन प्रक्रियेची मागणी केली होती."


डीएमके प्रमुख स्टॅलिन यांच्या अटी

आपल्या दोन अटींविषयी त्यांनी लिहिलं की, "तमिळनाडू विधानसभेत मंजूर झालेला ठराव आणि 'न्याय्य डिलिमिटेशन संयुक्त कृती समिती'च्या (Joint Action Committee for Fair Delimitation) बैठकीत घेतलेले निर्णय लक्षात घेता, आम्ही दोन स्पष्ट मागण्या मांडत आहोत. पहिली अट अशी की, जर संसदीय मतदारसंघांची संख्या वाढवली गेली, तर लोकसभेच्या एकूण जागांपैकी तमिळनाडूचा सध्याचा 7.18 टक्के वाटा कोणत्याही परिस्थितीत कमी होता कामा नये. दुसरी अट अशी की, राज्यांमधील संसदीय प्रतिनिधित्वाचे प्रमाण, जे 1971 च्या जनगणनेच्या आधारे निश्चित केले गेले होते आणि त्यानंतर 'गोठवून' (frozen) ठेवले होते, ते पुढील २५ वर्षांसाठी तसेच 'गोठवलेले' राहावे."

स्टॅलिन यांचा काँग्रेसवर निशाणा

एम. के. स्टॅलिन यांनी स्पष्ट केले की, डीएमके या दोन मागण्यांवर ठाम आहे आणि पुढेही राहील. त्यांनी म्हटले, "आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही आणि तडजोडीचा प्रश्नच उद्भवत नाही." दरम्यान, डीएमके प्रमुखांनी आपला जुना मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवरही अप्रत्यक्षपणे टीका केली.

स्टॅलिन म्हणाले, "माध्यमांमधील तर्कवितर्क किंवा पाठीमागून वार करणाऱ्यांची कुजबुज आमची भूमिका डळमळीत करू शकत नाही. जे लोक सत्तेच्या पदांसाठी आपली तत्त्वे सोडून देतात, अशा निर्लज्ज आणि कृतघ्न व्यक्तींनी हे लक्षात घ्यावे." त्यांनी पुढे सांगितले की, तमिळनाडूच्या हिताच्या बाबतीत डीएमके कधीही तडजोड करणार नाही आणि आपल्या मूळ तत्त्वांपासून कधीही विचलित होणार नाही.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES