• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /आधी मुलीचे कपडे घालायला लावले, मग मेकअप; तुरुंगात 20 वर्षीय तरुणासोबत विचित्र प्रकार; जेल अधिक्षकासह 19 जणांवर आरोप!

आधी मुलीचे कपडे घालायला लावले, मग मेकअप; तुरुंगात 20 वर्षीय तरुणासोबत विचित्र प्रकार; जेल अधिक्षकासह 19 जणांवर आरोप!

झारखंडमधील रांचीच्या बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये 20 वर्षीय तरुणावर तीन वेळा लैंगिक अत्याचार झालाय. याप्रकरणी जेल अधीक्षकांसह 19 जणांविरोधात एफआयआर दाखल झालाय.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 13, 2026, 15:06 IST|Updated: Nov 13, 2026, 15:10 IST
joinshare
आधी मुलीचे कपडे घालायला लावले, मग मेकअप; तुरुंगात 20 वर्षीय तरुणासोबत विचित्र प्रकार; जेल अधिक्षकासह 19 जणांवर आरोप!
Image Credit: रांची क्राइम

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

स्त्रीयांसोबत पुरुषही सुरक्षित नाही, अशा धक्कादायक घटना समोर येत आहेत. विकृतीचा कळस गाठणाऱ्यांना बंद खोली, निर्जन स्थळच हवे असते असे नाही. आता तुरुंगात पोलिसांच्या सुरक्षेतही तरुण सुरक्षित नसल्याचा प्रकार घडलाय. झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये एका 20 वर्षीय तरुणावर लैंगिक अत्याचार झालाय. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांनी जेल अधीक्षक, तुरुंगातील कर्मचारी आणि काही कैद्यांसह एकूण 19 जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.


साडी नेसवून मेकअप केल्याचा आरोप

तरुण तुरुंगात असताना काही कैद्यांनी त्याला जबरदस्तीने साडी नेसवली आणि मुलीसारखा मेकअप केला. त्यानंतर त्याला नशा आणणारे पेय जबरदस्तीने पाजले. तो बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये नेण्यात आले आणि तिथे अनेक जणांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणाच्या वडिलांनी यासंदर्भात तक्रार दाखल केलीय. अशा प्रकारची घटना एकदाच नव्हे तर तीन वेळा घडल्याचा दावा वडिलांनी केलाय. याप्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी खेलगाव पोलीस ठाण्यात या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला असून सध्या पोलिसांनी तपास सुरू आहे.

'तक्रार फाडली, उपचार नाकारले'

या धक्कादायक प्रकरणात तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेवरही या प्रकरणातून प्रश्न उपस्थित झाले आहेत. तरुणाने तुरुंगात असतानाच आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत लेखी तक्रार दिली होती. संबंधित अधिकाऱ्याने ती तक्रार फाडून टाकल्याचा आरोप वडिलांनी केला. अत्याचारानंतर तरुणाला वेदना आणि दुखापतींचा त्रास होत असतानाही तुरुंगातील रुग्णालयात योग्य वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, असेही तक्रारीत नमूद आहे.

तुरुंगातून सुटल्यानंतर कुटुंबाला सांगितला प्रकार

हा तरुण एका प्रकरणात विचाराधीन कैदी म्हणून तुरुंगात होता. 12 जून 2026 रोजी न्यायालयाने त्याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्याची सुटका झाली. घरी परतल्यानंतर त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. तो मानसिक तणावात असल्याचे पाहून कुटुंबीयांनी विचारपूस केली. त्यानंतर त्याने तुरुंगातील कथित घटनांची माहिती दिल्याचे वडिलांचे म्हणणे आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

रांचीचे डीएसपी संजीव बेसरा यांनी एफआयआर दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासादरम्यान कथित अत्याचार, लेखी तक्रार फाडल्याचा आरोप आणि वैद्यकीय मदत नाकारल्याच्या दाव्यांची चौकशी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणामुळे तुरुंगातील कैद्यांची सुरक्षितता, तक्रार निवारण यंत्रणा आणि वैद्यकीय सुविधांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
india