• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'शेतकरी तीन महिनेच काम करतो, उरलेले नऊ महिने पत्ते खेळण्यात, दारूमध्ये आणि...'; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

'शेतकरी तीन महिनेच काम करतो, उरलेले नऊ महिने पत्ते खेळण्यात, दारूमध्ये आणि...'; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

जाहीर भाषणांमध्ये अनेकदा वादग्रस्त विधानं करणाऱ्या भाजपाच्या या खासदाराने थेट शेतकऱ्यांवर निशाणा साधल्याचं दिसून आलं आहे. नेमकं या खासदाराने काय म्हटलं आहे जाणून घेऊयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 11, 2026, 06:40 IST|Updated: Nov 11, 2026, 06:56 IST
joinshare
'शेतकरी तीन महिनेच काम करतो, उरलेले नऊ महिने पत्ते खेळण्यात, दारूमध्ये आणि...'; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
Image Credit: शेतकऱ्यांना आपल्या भाषणामधून सुनावलं (फोटो सोशल मीडिया आणि एआयवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारतीय जनता पार्टीच्या एका खासदाराने शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. सदर खासदार मध्य प्रदेशमधील रेवा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. जनार्दन मिश्रा नावाचे हे खासदार त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा अडचणीत येतात. अनेकदा जाहीर भाषणांमध्ये त्यांनी केलेल्या विधानांवरुन वाद झाल्याचं दिसून आलं आहे. नुकतेच ते मौगंज जिल्ह्यातील राकरी ग्रामपंचायतीने कमल गोशाळेत आयोजित केलेल्या गोवर्धन पूजेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलताना, शेतकरी वर्षातील तीन महिने काम करतो आणि उतरलेले नऊ महिने पत्ते खेळण्यात आणि दारू पिण्यात घालतो, अशा कठोर शब्दांमध्ये शेतकऱ्यांवरच निशाणा साधला. सध्यांनी मिश्रा यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

भाजप खासदार शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?

भाजप खासदार जनार्दन मिश्रा शेतकऱ्यांच्या कामाबद्दल बोलताना, "शेतकरी फक्त तीन महिने काम करतात. उरलेले नऊ महिने ते काय करतात?" असा सवाल उपस्थितांना विचारला. त्यावर एका व्यक्तीने उत्तर दिले की ते पत्ते खेळतात. त्यावर जनार्दन मिश्रांनी, "उरलेले नऊ महिने पत्ते खेळण्यात, बाटल्या, लहानसहान वस्तू आणि 'राजश्री, जय भोले'च्या घोषणा देण्यात घालवले जातात. नऊ महिने रिकामे बसून घालवले जातात. मग ते म्हणतात की शेतीला काही अर्थच नाही," असं म्हणत शेतकऱ्यांना सुनावलं.

खऱ्या कष्टाची किंमत नसल्याची टीका

मिश्रा यांचे हे वक्तव्य मौगंज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल खासदारांनी केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या विधानानंतर मिश्रा यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांकडून शेतीतील खऱ्या कष्टाबद्दल खासदारांना कल्पना नसावी असं म्हटलं जात आहे. मिश्रांच्या विधानावरुन वादविवाद सुरू झाला आहे. मात्र एकीकडे हा वाद सुरु झालेला असताना दुसरीकडे या खासदाराने अद्याप आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. अनेकांनी खासदारही किती काम करतात असा सवाल केला आहे.

Indian Parliament runs for hardly 65 days in a whole year, and for the remaining 10 months.... BJP MPs like Janardan Mishra enjoy free Delhi bungalows, free business-class flights, and lifelong pensions... A politician who lives on taxpayer money for 10 months without work is standing on stage and telling the country that farmers only work for 3 months.

— Bayanbaazi (@Bayan__baazi) November 10, 2026

जनतेच्या संपर्कात असलेला नेता

खरं तर जनार्दन मिश्रा हे मध्य प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. ते सलग तीन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा रेवा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर 2019 आणि 2024 मध्ये त्यांनी ही जागा कायम राखली. 2024 मध्ये, त्यांनी काँग्रेसचे नीलम अभय मिश्रा यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. ते सतत जनतेच्या संपर्कात असतात आणि लोकांमध्ये वावरतात. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला नेता अशी त्यांची ओळख असल्याने ते अनेकदा कठोर शब्दांमध्ये लोकांना चार शब्द सुनावताना दिसतात.

मस्कलाही दिलेली धमकी

जनार्दन मिश्रा त्यांच्या वक्तव्यांमुळे यापूर्वीही चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं आहे. यापूर्वी, त्यांनी 'एक्स'चे (ट्विटरचे) मालक इलॉन मस्क यांना दोनदा बुक्की मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नाही, तर भारतात मस्क यांना व्यवसाय करायचा झाल्यास तो पंतप्रधान मोदींच्या अटींवरच करावा लागेल, असेही त्यांनी मस्क यांना इशारा देताना म्हटले होते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
india