• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /चांदीने मोडला 46 वर्षापूर्वीचा विक्रम! अवघ्या 30 मिनिटांत 37.20 लाख कोटी...; 2027 मध्ये चांदी महागणार की स्वस्त होणार?

चांदीने मोडला 46 वर्षापूर्वीचा विक्रम! अवघ्या 30 मिनिटांत 37.20 लाख कोटी...; 2027 मध्ये चांदी महागणार की स्वस्त होणार?

सोन्याच्या किंमतीबद्दल कायम बातम्या येत असतात. पण चांदीबद्दल एक मोठी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या तीव्र घसरणीमुळे एक विक्रम तोडला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 19, 2026, 21:22 IST|Updated: Nov 19, 2026, 21:30 IST
joinshare
चांदीने मोडला 46 वर्षापूर्वीचा विक्रम! अवघ्या 30 मिनिटांत 37.20 लाख कोटी...; 2027 मध्ये चांदी महागणार की स्वस्त होणार?
Image Credit: Gold Silver Price

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गेल्या दोन वर्षांमध्ये चांदी - सोन्यामध्ये चढ - उतार पाहिला मिळत आहे. तर आता चांदीच्या किमती सोन्यापेक्षा जास्त घसरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती 2.69 टक्क्यांनी घसरून सप्टेंबर 2025 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. गेल्या 12 तासांपासून सुरू असलेल्या या घसरणीमुळे अंदाजे 729 अब्ज डॉलर्स, म्हणजेच 64.9 लाख कोटी रुपयांचे नुकसान पाहिला मिळाले आहे.


तज्ज्ञांच्या मते, भारतातील अनेक शहरांत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.28 लाख रुपयांपर्यंत खाली गेल्याचे पाहिला मिळाले आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव 1980 च्या पातळीच्याही खाली गेला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, 1980 मध्ये चांदीत गुंतवलेले 10 हजार रुपये तब्बल 46 वर्षांनंतर केवळ 8,800 रुपये उरले असते म्हणजेच परतावा (रिटर्न) निगेटिव्ह झालाच पाहिला मिळत आहे.


चांदी 4.70 टक्क्यांनी घसरली असून, तिचे बाजार भांडवल 128 अब्ज डॉलर्स, म्हणजेच अंदाजे 1.4 लाख कोटी रुपयांनी कमी झालंय. चांदीच्या किमती ऑक्टोबर 2025 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. गोल्डमन सॅक्ससह तज्ज्ञ आणि प्रमुख ब्रोकरेज कंपन्यांच्या मते, अमेरिकेत महागाई झपाट्याने वाढली आहे, ज्यामुळे 2026 च्या शेवटच्या महिन्यात व्याजदरात अर्ध्या टक्क्याने वाढ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. याव्यतिरिक्त, डॉलरमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

हेसुद्धा वाचा - 2027 मध्ये सोन्याची किंमत किती असणार? बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने डोकं गरगरेल


18 नोव्हेंबर रोजी, दोन अहवाल प्रसिद्ध झाले आहेत.एक बँक ऑफ अमेरिकाकडून आणि दुसरा डीएसपीकडून. चांदीच्या किमतींनी अनेक विक्रम मोडले असून, 46 वर्षांचा विक्रमही
मोडीत काढला आहे.  2026 मध्ये प्रति औंस 121 डॉलर या सर्वकालीन उच्चांकावरून किमती 61% नी घसरल्या आहेत. त्या 1980 च्या पूर्वीच्या उच्चांकापेक्षाही खाली व्यवहार करत आहेत. ही घसरण का होत आहे? चांदी आणि सोन्याची विक्री कधी थांबेल? बँक ऑफ अमेरिकाच्या (BofA) एका नवीन अहवालानुसार, मजबूत अमेरिकन डॉलर, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीची भीती, यांमुळे चांदीच्या किमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचा व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतो. मजबूत डॉलरमुळे इतर चलनांमध्ये चांदी खरेदी करणे अधिक महाग होते, ज्यामुळे खरेदी कमी होते. दरम्यान, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढत आहे.

तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाईची चिंता वाढत आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांसंबंधीच्या हालचालींवर अधिकाधिक लक्ष ठेवून आहेत. जर व्याजदर वाढले, तर गुंतवणूकदारांना कमी जोखमीत जास्त परतावा देणारे इतर गुंतवणुकीचे पर्याय अधिक अनुकूल वाटतील. पुढे काय? तीव्र घसरण होऊनही, बँक ऑफ अमेरिकाच्या (BofA) अहवालातील अंदाजानुसार, 2027 पर्यंत चांदीचा भाव प्रति औंस 75 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. बँकेच्या मते, जर स्थूल आर्थिक दबाव कमी झाला, तर चांदीला आणखी आधार मिळू शकतो. BofA च्या अंदाजानुसार, 2026 मध्ये चांदीचा पुरवठा मागणीपेक्षा 910 टनांनी जास्त असू शकतो. पण, 2027 मध्ये परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gold Price
Silver Price