Gold- Silver price : जानेवारी 2026 मध्ये विक्रमी उच्चांक गाठणारे सोनं चांदीचे दर 8 महिन्यात अचानक गडगडले आहेत. चांदी तब्बल 197,395 रुपयांनी तर, सोनं 33,800 रुपयांनी स्वस्त झाले आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव आला आहे. देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे.
जागतिक बाजारात, कॉमेक्सवर सोन्याचे वायदे प्रति औंस सुमारे 4,200 डॉलरवर, तर चांदीचे वायदे प्रति औंस सुमारे 60.50 डॉलरवर व्यवहार करत होते. देशांतर्गत बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,49,450 वर, तर चांदीचा दर प्रति किलोग्रॅम सुमारे 2,22,650 इतका होता. एकूण आकडेवारी पाहता भारतीय सराफा बाजारात प्रचंड घसरणा झाली आहे.
जानेवारी 2026 मध्ये चांदीचा दर 4.50 लाखांपर्यंत पोहचला होता. तर, सोन्याच्या दराने देखील 1.80 लाखाच्या आसपास विक्रमी दराचा उच्चांक गाठला होता.
भारतीय चलन रुपया मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी, सलग तिसऱ्या दिवशी रुपयामध्ये जोरदार सुधारणा दिसून आली आणि डॉलरच्या तुलनेत 40 पैशांची वधारून तो 95.38 वर बंद झाला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अलीकडेच कठोर निर्णय घेतले. यामुळे रुपयाला मजबूती मिळाली. रुपयाच्या अवमूल्यन कमी करण्यासाठी आरबीआयने घेतलेले निर्णय गेम चेंजर ठरले. यामुळे रुपया वधारला आहे. आरबीआयच्या कठोर उपाययोजनांमुळे डॉलरची मागणी कमी झाली आहे. परकीय चलन बाजारातील अनावश्यक सट्टेबाजीला आळा बसला आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रुपया मजबूत होतो. डॉलरच्या तुलनेत परदेशातून सोने आयात करणे स्वस्त होते. याचा थेट फायदा देशांतर्गत बाजारात कमी झालेल्या किमतींच्या स्वरूपात ग्राहकांना होतो.