Silver Price Crash From High: सोन्याचे दर घसरत असताना चांदीच्या दरातही प्रचंड मोठी घसरण झाली आहे. चांदी तब्बल 2.50 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. साडे चार लाखाच्यावर पोहचलेला चांदीचा दर निच्चांकी दरावर कोसळला आहे. चांदीचा दर 1.75 लाखावर आला आहे.
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि देशांतर्गत बाजारपेठा या दोन्ही ठिकाणी मोठी घसरण झाली. 17 नोव्हेंबर रोजी वायदे बाजारात चांदीच्या दरात थोडी सुधारणा झाली. असे असले तरी जानेवारी 2026 मधील उच्चांकी दरापेक्षा चांदी 60 टक्केने स्वस्त झाली आहे. यामुळे चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
एमसीएक्सवर सातत्याने घसरत असलेल्या चांदीने अचानक उसळी घेतली आहे. 17 नोव्हेंबर रोजी वायदे बाजारात (फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये) चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. 4 डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या 1 किलो चांदीचा दर 1,69,719 रुपये होता.
अमेरिकेतील COMEX वर, 29 जानेवारी 2026 रोजी चांदीने प्रति औंस 121.67 डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्याच दिवशी MCX वरही चांदीच्या दराने विक्रम मोडले. 30 ऑक्टोबरपर्यंत चांदीचा दर 51 डॉलरवर आला होता. चांदीच्या दरात अंदाजे 58 टक्केची घसरण झाली होती. जानेवारी 2026 मध्ये चांदीने 4 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. चांदीच्या दराने 4.20 लाखांचा उच्चांक गाठला होता.
चांदीच्या दरात होत असलेली घरसण पाहता चांदीच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे बोलले जात आहे. जानेवारी 1980 मध्ये चांदीचा दर प्रति औंस अंदाजे 49.45 डॉलरवर पोहोचली होता. यानंतर वर्षभरात चांदीचे दर 90 टक्केने घसरले होते. सध्या देखील सराफा बाजरात अशाच प्रकारची स्थिती दिसत आहे. चांदीचे दर आणखी घरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.