SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

4.20 लाखाच्यावर गेलेली चांदी 2.50 लाखांनी स्वस्त! चांदीच्या दराबाबत इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

4.20 लाखाच्यावर गेलेली चांदी 2.50 लाखांनी स्वस्त झाली आहे. चांदीच्या दराबाबत इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 17, 2026, 22:26 IST | Updated: Nov 17, 2026, 22:30 IST
Join

Silver Price Crash From High: सोन्याचे दर घसरत असताना चांदीच्या दरातही प्रचंड मोठी घसरण झाली आहे. चांदी तब्बल 2.50 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. साडे चार लाखाच्यावर पोहचलेला चांदीचा दर निच्चांकी दरावर कोसळला आहे. चांदीचा दर 1.75 लाखावर आला आहे. 

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.  चांदीच्या दरात, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि देशांतर्गत बाजारपेठा या दोन्ही ठिकाणी मोठी घसरण झाली. 17 नोव्हेंबर रोजी वायदे बाजारात चांदीच्या दरात थोडी सुधारणा झाली. असे असले तरी जानेवारी 2026 मधील उच्चांकी दरापेक्षा चांदी 60 टक्केने स्वस्त झाली आहे. यामुळे चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना  मोठा धक्का बसला आहे. 

एमसीएक्सवर सातत्याने घसरत असलेल्या चांदीने अचानक उसळी घेतली आहे. 17 नोव्हेंबर रोजी  वायदे बाजारात (फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये) चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. 4 डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या 1 किलो चांदीचा दर 1,69,719 रुपये होता.   

अमेरिकेतील COMEX वर, 29 जानेवारी 2026 रोजी चांदीने प्रति औंस  121.67 डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला होता.  त्याच दिवशी MCX वरही चांदीच्या दराने विक्रम मोडले. 30 ऑक्टोबरपर्यंत चांदीचा दर 51 डॉलरवर आला होता. चांदीच्या दरात अंदाजे 58 टक्केची घसरण झाली होती.  जानेवारी 2026 मध्ये चांदीने 4 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. चांदीच्या दराने 4.20 लाखांचा उच्चांक गाठला होता. 

चांदीच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे का?

चांदीच्या दरात होत असलेली घरसण पाहता चांदीच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे बोलले जात आहे. जानेवारी 1980 मध्ये चांदीचा दर  प्रति औंस अंदाजे 49.45 डॉलरवर पोहोचली होता. यानंतर वर्षभरात चांदीचे दर 90 टक्केने घसरले होते. सध्या देखील सराफा बाजरात अशाच प्रकारची स्थिती दिसत आहे. चांदीचे दर आणखी घरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES