SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सोनिया गांधींच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार, काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केली घोषणा, 'इतके' कोटी दिले

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (टीपीसीसी) कार्यकारी अध्यक्ष जग्गा रेड्डी यांनी गुरुवारी संगारेड्डी येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान ही घोषणा केली.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 12, 2026, 13:18 IST | Updated: Nov 12, 2026, 13:20 IST
Image Credit: Belonging A Journey of Love
Join

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र बिलॉन्गिंगः ए जर्नी ऑफ लव प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात त्यांनी त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे वर्णन केले आहे. त्यांनी राजकीय गोष्टींवरही भाष्य केले आहे. लवकरच सोनिया गांधी यांच्या आयुष्यावर एक सिनेमादेखील येण्याची शक्यता आहे. अलीकडेच तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष जग्गा रेड्डी यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचे फिचर फिल्ममध्ये रुपांतर करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा त्यांनी संगारेड्डीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर केली आहे. जग्गा रेड्डी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांनी चित्रपट निर्मितीसाठी योगदान देण्याचंही अपील केले आहे.

बैठकीत संगारेड्डी क्षेत्राचे काँग्रेस संयोजक जुसकंती अंजनेयुलु यांनी चित्रपटासाठी दोन कोटी देण्याची घोषणा केली होती. जग्गा रेड्डी यांनी गांधी भवनचे जनसंपर्क अधिकारी हरिप्रसाद यांच्या देखरेखीखाली चित्रपट निर्मितीसाठी 20 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. ते म्हणाले, "तुम्ही निवडणुकीवर जसा खर्च करता, तसंच समजा. बजेट वाढवा आणि चांगल्या दिग्दर्शकाची निवड करा."  तयारी पूर्ण झाल्यावर, चित्रीकरण सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि टीपीसीसी अध्यक्ष महेश कुमार गौड यांना आमंत्रित करण्यात येईल, असंही समजतेय.

जग्गा रेड्डी यांनी म्हटलं की, चित्रपटात सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडले जातील. चित्रपटात इंदिरा गांधी यांची सून, राजीव गांधी यांची पत्नी आणि राहुल-प्रियंका गांधी यांची आई हे सगळी रुपे बघायला मिळतील. चित्रपटात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर आलेले दुःख, सोनिया गांधी यांनी सहन केलेली कठिण परिस्थिती, मुलांना संभाळण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांचा राजकीय प्रवास हे देखील दाखवण्यात येईल.

सोनिया गांधींनी भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात स्वतःला सिद्ध केले. पंतप्रधानपदाबद्दल त्यांनी कोणतीही इच्छा दाखवली नाही. राजीव गांधींच्या हत्येनंतर आणि नंतर जेव्हा यूपीए सरकार स्थापन झाले, तेव्हा जेव्हा नेत्यांनी त्यांना पंतप्रधान बनवण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी नकार दिला आणि मनमोहन सिंग यांना संधी दिली. सोनिया गांधींच्या विचारांनी मनरेगासारख्या योजनांनाही हातभार लावला, असंही जग्गा रेड्डी यांनी म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES