SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं; ''हो चर्चा झाली, तारीख ठरली...' तर सत्तेत जाण्याबद्दल...

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. त्यात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये बैठक झाली असंही समोर आलं आहे. त्यावर सु्प्रिया सुळे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 14, 2026, 11:21 AM IST | Updated: Nov 14, 2026, 11:53 AM IST
Image Credit: Supriya Sule ncp
Join

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार आहे, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून मुंबईत अनेक भेटीगाठी होत आहे, असं दिसून येतंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार अशी जोरदार चर्चा असताना सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात?


दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर तर्क वितर्क रोज चालत असतात. मी कोणत्याही तातडीसाठी पत्रकार परिषद बोलावली नाहीय. तुम्ही तेच तेच प्रश्न विचारुन तुमचा आणि माझा टीआरपी घातवताय, असं त्यांनी स्पष्टच सांगितलं. त्या पुढे म्हणाल्यात की, मला त्याच त्या प्रश्नांचा कंटाळा आलाय. माझा दादा अजित पवार असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती. त्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले आहेत. मी आणि अनेक नेत्यांनी सांगितलं की, हो अजित पवारांसोबत दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा झाली होती. मात्र, ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं त्यादिवशी विलिनीकरणाच्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे. तारीखही ठरली होती. आमच्या पक्षाचा कोणताही नेत्या त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलेला नाही. आमचं एकत्र जाणं भावाबरोबर ठरलं होतं. तोच राहिला नाही, तर एकत्र जाण्याचा प्रश्नच येत नाही.  हा आमच्यासाठी भावनिक मुद्दा आहे आणि तो माझ्या भावाचे नातं आहे. आता कुठलेही चर्चा झालेली नाहीत. यापुढे मी जे नातं हे माझ्या भावासोबत होतं, मात्र आता भाऊच नाही राहिला आता काय चर्चा करणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, माझ्या आणि माझ्या भावाच्या मधील गोष्टी आहेत, त्या आमच्यामध्येच राहणार.

प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बैठकीत काय झालं?


अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची दिल्लीत बैठक झाली अशी माहिती समोर आली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं की, मी प्रफुल्ल पटेल यांना आठवड्यातून एकतर भेटतेच. अनेक प्रकल्पावर आमच्या कामानिमित्त भेट होत असते. प्रफुल पटेल आणि आमचे संबंध 6 दशकांचे आहेत. प्रफुल पटेल आणि मी दोन जेपीसीवर एकत्र आलो आहेत. 

एनडीएसोबत जाणार आहात का?

दरम्यान एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांसंदर्भातही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी सांगितलं की, मला कुणाचाही फोन, मेसेज, इमेल, जे काही असतं तसं काहीही आलेले नाही, असं सांगत या चर्चांनाही पूर्णविराम लावला आहे. तर डिलिमिटेशनबाबत आमची बैठक झाली. 50% जागा वाढणार असेल तर विचार करणार, असंही त्या यावेळी म्हणाल्यात. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES