राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील शहरांना दमदार कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर शहराने मागील अनेक वर्षांपासून स्वच्छ शहर होण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र इंदूरची ही मत्तेदारी महाराष्ट्रातील एका शहराने मोडून काढत पाहिला क्रमांक पटकावला असून हे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. तर राज्य स्तरावरील पुरस्कारांमध्ये पुण्यातील एका शहराने सर्वात स्वच्छ शहर होण्याचा बहुमान मिळवला आहे.
सर्व स्वच्छ शहर महाराष्ट्रात
शहरी स्वच्छतेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ‘स्वच्छ शहर लीग’मध्ये आंध्र प्रदेशमधील विजयवाडा शहराने तिसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर गुजरातमधील सुरत शहर असून पहिलं स्थान महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराने पटकावलं आहे. सलग 8 वर्षे अव्वल स्थानी असलेल्या इंदूरला मागे टाकत, देशातील 4751 शहरांच्या स्पर्धेत नवी मुंबईने हा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे.
पहिला क्रमांक मिळण्याची कारणं काय?
शहरातील दैनंदिन कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण, घरोघरी जाऊन कचरा संकलन आणि त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्याची प्रभावी यंत्रणा राबवणे, 7 स्टार कचरामुक्त शहर दर्जा कायम राखण्यात मिळालेलं यश, स्वच्छता मोहिमेवर आणि कचरा वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल देखरेखीचा प्रभावी वापर आणि 'निश्चय केला, नंबर पहिला' या ध्येयवाक्याखाली महानगरपालिकेचे स्वच्छतादूत, अधिकारी आणि नवी मुंबईतील नागरिकांनी एकत्रितपणे उभ्या केलेल्या स्वच्छता चळवळीचं हे एकत्रित यश असल्याचं सांगितलं जात आहे.
#WATCH | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ पुरस्कारांचं वितरण शहरी स्वच्छतेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ‘स्वच्छ शहर लीग’मधील आघाडीची तीन शहरं : प्रथम क्रमांक – नवी मुंबई, महाराष्ट्र द्वितीय क्रमांक – सुरत, गुजरात तृतीय क्रमांक – विजयवाडा, आंध्र प्रदेश #SwachhSurvekshan #SwachhSurvekshanAwards #SwachhBharat #NaviMumbai @NMMConline
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 11, 2026
महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं?
तसेच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळ्यात पिंपरी-चिंचवड शहराला ‘महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर’ म्हणून राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला.
#WATCH | स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळ्यात पिंपरी-चिंचवड शहराला ‘महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर’ (राज्यस्तरीय प्रथम क्रमांक) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. #SwachhSurvekshan #SwachhSurvekshanAwards #SwachhBharat #PimpriChinchwad @pcmcindiagovin https://t.co/yCnGGSBR4C
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 11, 2026
किनारपट्टी शहरच्या यादीत अव्वल तीनमध्ये महाराष्ट्रातलं शहर
स्वच्छ किनारपट्टी शहरच्या यादीमध्ये ओडिशाच्या पुरी शहराला पहिला क्रमांक मिळाला असून दुसरा क्रमांक केरळच्या अलप्पुझा शहराला मिळाला आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
#WATCH | स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ अंतर्गत स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरांचा गौरव करण्यात आला. स्वच्छ किनारपट्टी शहर (Swachh Coastal Town) या श्रेणीत : पहिला क्रमांक – पुरी, ओडिशा दुसरा क्रमांक – अलप्पुझा, केरळ तिसरा क्रमांक – रत्नागिरी, महाराष्ट्र #SwachhSurvekshan #SwachhSurvekshanAwards #SwachhBharat @InfoRatnagiri
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 11, 2026
छोट्या शहरांमध्येही महाराष्ट्राचा डंका
20 हजार ते 50 हजार लोकसंख्या गटातील ‘स्वच्छ शहर’ श्रेणीत विटा (सांगली) शहरानं प्रथम क्रमांक पटकावला आहे.
#WATCH |स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ मध्ये २० हजार ते ५० हजार लोकसंख्या गटातील ‘स्वच्छ शहर’ श्रेणीत विटा शहरानं प्रथम क्रमांक पटकावला. #SwachhSurvekshan #SwachhBharat #Vita #Maharashtra #CleanIndia https://t.co/aE9sgbCUHq
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 11, 2026
पाचगणीलाही मिळाला पुरस्कार
20 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या ‘स्वच्छ शहर’ श्रेणीत पाचगणीने (सातारा) द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
#WATCH | स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ मध्ये २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या ‘स्वच्छ शहर’ श्रेणीत पाचगणीने द्वितीय क्रमांक पटकावला. #SwachhSurvekshan #SwachhBharat #Panchgani #Maharashtra #CleanIndia https://t.co/vd69jwdhdk
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 11, 2026
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आणि महापौर सुजाता पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहर म्हणून प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार स्वीकारला.