SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

₹11 लाख घे आणि नोकरी सोड! Microsoft ने इंजिनिअर तरुणाला का दिली ही ऑफर?

एका 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला नोकरी सोडण्यासाठी Microsoft कंपनीने 11 लाखांची ऑफर दिली आहे. काय आहे या मागील कारण?

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 02, 2026, 09:02 AM IST | Updated: Nov 02, 2026, 09:05 AM IST
Image Credit: Microsoft engineer
Join

गेल्या वर्षभरात अनेक प्रसिद्ध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीकपात करण्यात आली आहे. अचानक एका मेल होतो आणि असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावरही दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी कपात करण्यात आली आहे. AI सेवा कंपनी Innodata ने तब्बल 550 भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. तर  Amazon ने 250 जणांना अचानक एक मेल पाठवून कामावर येऊ नका असं सांगितलं. अशात सोशल मीडियावर एका इंजिनिअर तरुणाची पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात त्याने लिहिलं की, Microsoft कंपनी तिला नोकरीसाठी ₹11 लाखांची ऑफर देत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, मायक्रोसॉफ्टने आपल्या 60000 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती किंवा रजेचा पर्याय दिल्यामुळे एकच खळबळ माजली होती. या हैदराबादमधील एका 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने सांगितलं की, कंपनीने तिला नोकरी सोडण्यासाठी 11 लाखांची ऑफर दिली. त्यामुळे आता त्याला समजत नाहीय की, 11 लाख घेऊन नोकरी सोडू की कंपनीत राहून काम करू. त्याची ही द्विधा मनस्थितीबद्दल त्याने रेडिटवर मांडली आहे. यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

ही ऑफर स्वीकारावी का?

या तरुणाने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील r/hyderabad कम्युनिटीवर एक पोस्ट शेअर केल्यानंतर तो सध्या चर्चेत आला आहे.  मायक्रोसॉफ्टची 'व्हॉलंटरी एक्झिट ऑफर' नावाखाली 60000 कर्मचाऱ्यांना ऑफर दिली की, तीन महिन्यांचा पूर्ण पगार घ्या आणि नोकरी सोडा. त्याला यानुसार 11 लाख मिळणार आहे. त्याने सोशल मीडियावर प्रश्न विचारला की, मी ही ऑफर स्वीकारावी का?

हेसुद्धा वाचा -  550 भारतीय लंच ब्रेकअप गेले अन्...लॅपटॉप लॉगआउट, आयडी बंद; पर्सनल मेल आला मग, या कंपनीमध्ये भयानक घडलं

या तरुणाच्या पोस्टनंतर युजर्सकडून तुफान प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक जण आपली मतं मांडत आहेत. खरं तर यावर तीन वेगवेगळा प्रतिक्रिया आल्या आहेत. पहिली प्रतिक्रिया म्हणजे हा खूप कठीण निर्णय आहे. तर काही यूजर्सने म्हटलं की, सध्या नोकरी मिळणं कठीण आहे, त्यामुळे अशा स्थितीत चांगल्या कंपनीतील नोकरी सोडू नका. तर तिसरा पर्याय की, पैसे घे आणि नोकरी सोड आणि नवीन नोकरी शोध. यजूर्सने तीन पर्याय दिल्यामुळे आता या तरुण काय निर्णय माहिती नाही. पण त्यांनी त्याची मनस्थितीबद्दल सोशल मीडियावर शेअर केली. यातून त्याचा गोंधळ कमी झाला की वाढला हे त्यालाच माहिती.

मायक्रोसॉफ्टची VEO योजना नेमकी काय आहे?

स्वैच्छिक निर्गमन प्रस्ताव योजना म्हणजे  ऐच्छिक राजीनामा असं आहे. या घोषणा मायक्रोसॉफ्ट कंपनीने 26 ऑक्टोबरला केली होती. या बातमीनंतर जगात खळबळ माजली. यात 23000 भारतीयांना ऑफर देण्यात आली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES